प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधून सिंदी रेल्वे शहरात कायमस्वरूपी तहसिलदार देण्याची मागणी मान्य झाल्याने घेतलें आंदोलन मागे..(  tahsilnews )

 

tahsilnews:सिंदी रेल्वे शहराला तालुकाचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी शॅडो तहसील उभारत केले अनोखे आंदोलन…

सिंदी वासियांनी अनुभवला आंदोलनादरम्यान एक दिवसाचा सिंदी (रेल्वे) तालुक्याचा अनुभव..

सिंदी रेल्वे तालुक्याचा बोर्ड पाहून अनेक गावकरी झाले भाऊक…

सिंदी रेल्वे शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची देखिल करण्यात आली मागणी…

तहसीलदार व नगर पालिका मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक …

भर पावसात राष्ट्रवादीचे सिंदी रेल्वे शहराला तालुका मिळण्यासाठी आंदोलन करीत उभारण्यात आले स्वतंत्र तहसील कार्यालय…

भर पावसात सिंदि रेल्वे शहर वासीयांच्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद…

प्रतिनिधी सचिन वाघे

tahsilnews:सिंदी रेल्वे :- सिंदी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले आक्रमक झाले .आज शाडो तहसील कार्यालय उभारून अनोखे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले…

शेतकर्यांच्या विविध मागण्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार)गटा कडुन तहसील कार्यालय लोणारला निवेदन ( sharadpawar)

भर पावसात झालेल्या या अनोख्या आंदोलनात सहभागी सिंदी करांनी एक दिवसासाठी का होईना सिंदी रेल्वे शहर तालुका झाल्याचा अनुभव घेतला.. सिंदी रेल्वे तालुक्याचा बोर्ड पाहून शहरातील अनेक नागरिक भाऊक झाले होते ..

सिंदी रेल्वे शहराला स्वातंत्रपूर्व काळापासून नगर परिषद आहे. येथून २ कि.मी अंतरावर नागपूर जिल्हा सुरु होतो. या शहराचा आजू – बाजूला ३५ ते ४० खेडे आहे. तेथील नागरिकांना सिंदी येथे जाणे सहज सोयीचे आहे. शासनाचे नवनवीन नियमापासून नागरिकांना सतत तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. उत्पन्नाचा दाखला, ऑफेडेव्हिड, अधिवास प्रमाणपत्र, खरेदी विक्रीचे व्यवहार, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड व इतर कोणतेही अडचण आल्यास तहसील कार्यालयात जावे लागते,

एक वेळ गेल्याने काम होत नाही. प्रत्येक वेळी ३-४ चकरा मारव्याच लागतात. सिंदी वरून सेलू २३ कि. मी. अंतरावर आहे. इतर ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा अगोदर हिंदी ला यावे लागते व येथून सेलूला जावे लागते परंतु जाण्यासाठी प्रवासी साधन नसल्यामुळे ओटोची याट बघत बसावे लागते. त्यामुळे संपूर्ण दिवस वाया जातो. मजुरी जाते. ओटोचा खर्च जास्ती होतो व वेळ वाया जातो.

या करिता सण २००४ व सण २०१५ मध्ये शासनाला निवेदन देऊन सिंदी शहराला तहसिलचा दर्जा मिळण्याकरिता मागणी करण्यात आली होती त्याचा उपयोग एवढाच झाला कि, सिंदी येथे मा. नायब तहसीलदारांना आठवड्‌यात १ दिवस सिंदीला दिले अर्थात नागरिकांना १० टक्के त्रास वाचला परंतु ९० टक्के कायम आहे. दिनांक २७/०६/२०२४ रोजी मा मुख्यमत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा. नायब तहसीलदार यांचे मार्फत जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले होते.

सिंदी रेल्वे शहरापासून राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ सात किमी अंतरावर असून या महार्गावर अपघात जास्त होत असतात. अश्यावेळी रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा याकरिता सिंदी रेल्वेत येथे उपजिल्हा रुग्णालय होणे महत्वाचे आहे. हिंगणघाट येथे जिल्हा रुग्णालय मंजूर झाले असल्याने सिंदी रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालय देणे शक्य आहे. त्यामुळे सिंदी रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे. तसेच सिंदी रेल्वे शहराला तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सेलू तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तहसीलचा मुद्धाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करू तसेच न.पा. मुख्याधिकारी बाबत दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊ तसेच नायब तहसीलदार यांची तात्काळ कायम स्वरूपी नियुक्ती केली.

tahsilnews:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी न.पा उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, अविनाश काकडे, काँग्रेसचे प्रकाशचंद्र डफ, अशोक वांदिले, अनिल देशमुख, आशिष देवतळे, माजी नगराध्यक्ष संगीता शेंडे, डॉ.शालिनी मुडे, राजू तळवेकर,माजी नगरसेविका सुमन पाटील, माजी नगरसेवक रामअवतार तुरक्याल, शिवसेनेचे सचिन लांबट, मुन्ना शुक्ला,प्रभाकर तडस,युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर,प्रभाकर तडस, प्रभाकर कलोडे, फिरोज बेरा,धनराज झिलपे, शंकर काटवले, संदीप सोनटक्के, नितीन भांडक्कर,हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे,वर्धा विधानसभा अध्यक्ष मिलिंद हिवलेकर,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुभाष चौधरी,ऍड पंकज झाडे, युगल अवचट,प्रवीण कलोडे, बंटी बेलखोडे,गुड्डू कुरेशी,बबलू खान, दिनेश घोडमारे, जगदीश बोरकर,वसंता सिरसे,सुनील घोदखांडे, धिरज येरने, माजी सरपंच अरुण भट्ट, गजानन धाबडधुसके,गजू गलांडे, विशाल चिंनचूलकर, महादेव वांदिले, विलास कोकाटे, प्रमोद तमगिरे, श्रावण ठाकरे, अल्पेश वाघमारे, भारत रोकडे, दिगांबर पूरी, नितीन वानखेडे, मुकीदा पुसुड्डे, भारत हिवंज, योगेश शेळके, नरेश कळवडे,सुभाष चौधरी, मनोज तिमांडे, शरद दुरुगवार, अनिल आडकीने, तुषार थुटे,निता गजबे, सिमा तिवारी, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, नालंदा राऊत, आचल वकील, सुनीता तांमगाडगे, मंगला कुमरे, सुचिता सातपुते,मंगल सोनटक्के, पप्पू आष्टीकर,विपुल थुल यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment