शिवसेना भवनात जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद ( shivsenanews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

shivsenanews:लोणार शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी सुरू केलेल्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सविस्तर वृत्त असे की लोणार येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक यांनी अनेक शेतकरी ज्यांनी त्या बँकेकडून पीक कर्ज घेतलेले आहे त्यांच्या खात्यावर होल्ड लावण्यात आले आहे जेव्हा की लोणार तालुका गतवर्षी दुष्काळग्रस्त घोषित झालेला असताना बँक शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावू शकत नाही,

त्यांना आलेल्या दुष्काळीची मदत, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यास न देता त्यांचे अकाउंट होल्ड करून कर्ज भरण्यास दबाव आणत आहेत.

बिबी पोलीस स्टेशनची यशश्वि कामगीरी घरफोडीच्या आरोपीला अटक ( policenews )

याकरिता विविध गावातून आलेल्या शेतकरी यांनी आपली कैफियत जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्याकडे जनता दरबारात मांडली त्या सर्व समस्या एकूण समजून डॉ.बछिरे यांनी बँकेशी संपर्क साधला व गतवर्षी लोणार तालुका दुष्काळग्रस्त घोषित असताना कर्ज परत फेडीसाठी शेतकऱ्यांना विधवा म्हणता येणार नाही,

त्यांच्या खात्यावर होल्ड लावता येणार नाही हे खडसावून सांगितले व आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरील होल्ड काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत विड्रॉल करून द्या

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तेव्हा व्यवस्थापकांनी बछिरे त्यांच्यासोबत आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरील होल्ड काढून त्यांची रक्कम विड्रॉल करून दिली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

shivsenanews:या जनता दरबारास बोरखेडी, सुलतानपूर, गंधारी, गायखेड, कुंडलस, रायगाव येथील शेतकरी यांनी आपली कैफियत मांडून त्यांच्या समस्या डॉ.बछीरे यांनी दूर केल्या याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, कृ. उ.बा.स.संचालक तेजराव घायाळ, राजू दहातोंडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Leave a Comment