लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

 

shivsena:लोणार येथील भूमिगत गटार योजना विषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावनी

लोणार येथील भूमिगत गटार योजने विषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला नदेता सहा महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे.

या भूमिगत गटार योजनेची पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार कुठून कुठपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासाचे  पाईप वापरणार व सदरील गटारीचे घाण पाणी कोठे साठवणार हि योजना आताची लोकसंख्या व  भविष्यत १० वर्षाने किती लोकसंख्या वाढेल व हि भूमिगत गटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे.

याविषयीची माहिती कुणालाही नाही, त्याचबरोबर लोणार  सरोवर शेजारी माळीवाडा परिसर येथे खोदकाम करत आहात.

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागा कडून  सरोवर परिसरात कोणतीही खोदकाम, कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोनमध्ये करू नये असा नियम असताना आपण 30–30 फूट खोल व 12–12 फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागाच्या नियमांचे  उल्लंघन कोणत्या आधारे केले.

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

याची संपूर्ण माहिती  येत्या सात दिवसात लोणार येथील जनतेसमोर ऊजागर करण्यात यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात येईल देण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येत्या सात दिवसात सदरील माहिती समाजास व आम्हास न मिळाल्यास आठव्या दिवशी म्हणजेच ०७  जून २०२४ ला  आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसूत याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी चेतावणी शिवसेना उभा ठाकरे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बशिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे

shivsena:यांनी दिली याप्रसंगी शिवसेनेचे परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ तेजराव घायाळ, राजुभाऊ बुधवत,अमोल सुटे, असरुबा धारकर, गणेश पाठे, किरण कमडे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते

 

Leave a Comment