शिवजयंती निमित्त जय राजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य ऐतिहासिक मिरवणूकीचे आयोजन(shivjayanti)

 

बुलडाणा जावेद शहा

shivjayanti:रायपूर प्र. दि. 17 फेब्रु शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य ऐतिहासिक मिरवणूक लवाजम्यासह जय राजे मित्र मंडळ यांचे वतीने रायपूर ता बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

सविस्तर वृत्त असे की, जय राजे मित्र मंडळ रायपूर यांच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध व्याख्याने, विविध स्पर्धा घेण्यात येतात. एका आठवड्यापासून शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली जाते. तसेच यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या राजाची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

या मिरवणुकीचे विशेष म्हणजे आम्ही चिखलीकर ढोल पथक, महीला मावळे, घोडयावर विराजमान मा. जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, मावळे, चोपदार, भजन, विविध रथ, राजमुद्रा व भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ मुर्ती अशी ऐतिहासिक मिरवणूक काढली जाणार आहे.

shivjayanti:शिवजयंती विशेष म्हणजे रायपूर या गावात दिवाळी प्रमाणे दिपोत्सव करुन राजांचा उत्सव साजरा केला जातो. सर्व हिंदू -मुस्लिम बांधवांचा व सर्वधर्मीय समाजाचा सहभाग या जयंती मध्ये असतो. तरी सर्वांनी या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment