इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव. shegaonnews: माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन संत नगरी शेगाव येथे *स्वच्छ शेगाव सुंदर शेगाव* ही भूमिका बजावत सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे.
परंतु शेगाव नगरातून गौलखेड रस्त्याने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी या भागामध्ये गेल्या सहा-सात महिन्यापासून डुकरांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. घरासमोरील झाडं, परसबाग, आणि सुकवायला ठाकलेले धान्य डुकरं नष्ट करून टाकतात.
तसेच बाहेर लहान मुलांना खेळणे सुद्धा अवघड झाले आहे .प्रत्येक रहिवाशाला दररोज डुकरांचा सामना करावा लागत आहे आणि जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ अशा संत नगरीत द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी येथे मात्र डुकरांनी जगणे कठीण केले आहे.
पोलीस ठाण्यातील गोळीबारावर अजित पवार स्पष्ट बोलले कि हे नाही पटलं, ( Ganpat Gaikwad Firing )
याबाबतीत नगरपरिषद शेगाव कडे सहा महिन्यापूर्वी तशी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे परंतु अजूनही त्या तक्रारीची साधी दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.
उलट डूकरांची संख्या पाच वरून ५० झाली आहे तरी कृपया समस्त द्वारकाधीश नगरातील आणि आरोग्य कॉलनीतील रहिवाशी नगर परिषदेकडून अशी आशा करत आहेत.
shegaonnews: की या डुकरांच्या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळावी व आम्हाला आरोग्यपूर्ण व सुखाचे जीवन जगता यावे आणि आमच्या लहान मुलांना आमच्या कॉलनीमध्ये स्वच्छंदपणे खेळता यावे एवढी रास्ता पेक्षा धरून आम्ही आपणास विनंती करतो की आम्हाला डुकरांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी.