शेगाव येथील अवैध धंदे पूर्णतः बंद शेगाव तालुका पत्रकारांच्या मागणीला आले यश (shegaonnews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

shegaonnews:संत नगरी शेगाव येथे शहरी व ग्रामीण भागात अवैध धंदे (वरली मटका, जुगार, देशी विदेशी दारूची विक्री, देहव्यापर, तितली भवरा) जोरदार प्रमाणात सुरू होते.

रेती तस्करांना तहसीलदारांचा अभय: संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन.(prashant patil )

हे अवैध धंदे कोणाच्या वरदहस्थामुळे सुरू आहेत याची चौकशी करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

परंतु पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्याविषयी कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला १०/०३/२०२५ रोजी उपोषणाला बसण्याचे पत्र देण्यात आले होते.

shegaonnews:मात्र पोलीस प्रशासनाकडून ०९/०३/२०२५ रोजीच्या रात्रीच शेगाव येथील सर्व प्रकारचे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात आल्याने पत्रकारांच्या मागणीला यश आल्यामुळे शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने १०/०३/२०२५ रोजीचे उपोषण मागे घेण्यात आले..

Leave a Comment