राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना डी.आर.यू.सी.सी. सदस्यत्वाचे ओळखपत्र प्रदान(Shegaonnews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

शेगाव, दि. ___ : राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना रेल्वे विभागाकडून डी.आर.यू.सी.सी. (डिव्हिजनल रेल्वे यूजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यत्वाचे ओळखपत्र प्रदान करण्यात आले. हा विशेष सोहळा शेगाव रेल्वे स्थानकावर स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षा मनीषा टाकसाळ, दिव्यांग आघाडीच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षा मनीषा खेडकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष वैशालीताई जोशी, शेगाव तालुका अध्यक्ष प्रीती तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बांग्लादेशातील अल्पसंख्य हिंदु बांधवांवर अत्याचारांविरुद्ध बुढालणा जिल्हा भाजपाच्या वतिने निषेध आंदोलन करण्यात आले(buldhana )

कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील सक्रिय पदाधिकारी बबीता बहुराशी, रूपाली धावडे, रूपाली ठाकरे, रश्मी इंदूरकर, पुनम माधणे, मोनाली उंदीरवाडे, अर्चना वानखडे, सुशीला ताथरकर, स्नेहल बऱ्हाणपूर, अनिता इंगळे, सुजाता थातरकर, उर्मिला तायडे, अन्वय ठाकरे, मनीषा भगत, ज्योती घोगले, पुष्पा काळे यांचीही उपस्थिती होती.

महिला भगिनींच्या संघटनेने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार बांधवांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि संघटनेच्या उपक्रमांना पाठिंबा दिला.

या ओळखपत्रामुळे माधुरीताई शर्मा यांना रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी सांगितले. महिलांच्या प्रवासी सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठीही संघटना विशेष प्रयत्नशील राहील, असे माधुरीताई शर्मा यांनी आपल्या मनोगतात म्हटले.

Shegaonnews :कार्यक्रमाचे संयोजन अतिशय यशस्वीरीत्या पार पडले आणि रेल्वे विभागाने संघटनेच्या कार्याला दिलेला पाठिंबा यापुढील काळात महिलांच्या हक्कांसाठी उपयोगी पडेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment