महाराष्ट्राचे कामगार मंत्री नामदार अॅड. आकाश दादा फुंडकर यांनी घेतले श्रींच्या समाधीचे आई व पत्नीसह घेतले दर्शन(shegaonnews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

shegaonnews:शेगाव, दि. २२ डिसेंबर : महाराष्ट्राचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश दादा फुंडकर यांनी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रथमच संत नगरी शेगावला भेट दिली.

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे “तेजस” – द्विवार्षिक क्रीडा दिनाचा भव्य सोहळा संपन्न(Hingnghat)

या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्यासह श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या या आगमनामुळे संत नगरीत भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

नामदार आकाश दादा फुंडकर मंदिरात पोहोचल्यावर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी मंत्रिमहोदयांचा सत्कार केला.

shegaonnews:त्यांनी मंदिराच्या पवित्र वातावरणात सपरिवार श्रींना वंदन केले आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीच्या प्रार्थना केल्या.

Leave a Comment