शहारातील संत कबीर वॉर्डात परिवर्तनाची लाट: युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश(sharadpawar)

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी / सचिन वाघे हिंगणघाट

सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश…

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला पक्ष प्रवेश…

sharadpawar:हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे सर्किय पदाधिकारी सूरज खोंडे यांच्या नेतृत्त्वात संत कबीर वॉर्डातील अनेक युवकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश करत आपल्या राजकीय कारकीर्दीचा नवा प्रवास सुरू केला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

हा पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या निवासस्थानी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यात अनेक मान्यवर आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जत उर्फ रजनिष देवतळे,राजू आंबटकर, गौरव देवतळे, प्रफुल जुमडे, सलमान सय्यद, रोशन पातणे, पवन ढोकपांडे, अनिकेत दांडेकर, ओम बेले, सचिन पातणे, सागर चातेक, प्रदीप महाकाळे, गजानन गेडाम, गजू बाळबुधे, महेश दुरणे, चेतन लोणकर, संतोष उईके, , निलेश महाकाळे, करण सातपुते, धनंजय एकोंनकर, प्रतीक तोडासे आदींनी पक्ष प्रवेश केला. युवकांच्या या पक्ष प्रवेशामुळे वॉर्डात नवीन राजकीय बदलाचे वारे वाहत आहेत, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळ मिळणार आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी युवकांना मार्गदर्शन करत राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी युवकांना आवाहन केले की, राजकारण ही केवळ सत्ताकारणाची लढाई नसून सामाजिक सेवा, लोकांच्या प्रश्नांवर काम करणे, आणि लोकांच्या विश्वासाला योग्य ठरवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अतुल वांदिले यांनी युवकांच्या सहभागाने पक्षाला मिळणाऱ्या नवीन उर्जाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

sharadpawar:या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, यांच्यसह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, सूरज खोंडे, मुकेश मुसळे, आकाश हूरर्ले, रोहीत लेदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment