प्रतिनिधी सचिन वाघे
sharadpawar:हिंगणघाट – सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात हिंगणघाट शहरातील बुथ अध्यक्षांची बैठक पार पडली.
हिंगणघाट शहरातील नंदोरी रोडवरील साई मंदिर हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या २ महिन्यात विधानसभा निवडणुक लागण्याची शक्यता आहे.
त्यात बदल १०० टक्के होणार आहे. त्यामुळे सर्व बुथ अध्यक्षांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जोमाने कामाला लागावे, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या सर्व बुथ अध्यक्षांना प्रेरणादायी मार्दर्शन करत त्यांना आत्मविश्वास वाढवला.
याप्रसंगी सर्व बुथ अध्यक्षांनी आपल्या समस्या आणि मनोगतही मांडले. या सर्व समस्या अतुल वांदिले यांनी ऐकून घेत लवकरच या समस्यांवर तोडगा काढू असे आश्वासनही दिले.
या बैठकीला सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, सहकार नेते वासुदेव गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अल्पसंख्याक प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, सुनील वांदिले, श्रीकांत भगत, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक नाझीर अली,हेमंत घोडे,अजय पर्बत, जितेंद्र रघाटाटे, संजय गांभुले, अनिल लांबट, अन्सार शेख, राजू मेसेकर, पुरुषोत्तम कांबळे, श्रीधार्थ मस्के, सुभाष सोयाम, परम बावणे, ऋषिकेश मेश्राम, विनोद घिमेकर, प्रशांत एकोणकर, अमोल भिषेकर,
sharadpawar:सुनील घोडखांडे, प्रवीण कलोडे,बबलू शेख, कुणाल येसम्बरे, देवा गवळी, अमित रंगारी, अहमद खान पठाण, गजू लाजूरकर, रंजित भोमले, महिला जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा सचिव सुचिता सातपुते, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, विधानसभा उपाध्यक्षा विद्या गिरी, शहर संघटिका मिना सोनटक्के, शहर सचिव दिपाली रंगारी, मंगला कुमरे, नालंदा राऊत, सुनिता तामगाडगे यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व बूथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.