प्रतिनिधी सचिन वाघे
sharadpawar:हिंगणघाट:- महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले.
स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे. सर्वप्रथम राज्याचा विचार करण्याऐवजी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या तुकड्यावर समाधानी राहून उघड्या डोळ्यांनी आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राचा देशातील क्रमांक खाली घसरताना पाहणारे हे महायुतीचे दळभद्री सरकार आहे.
राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असल्यामुळे यासाठी आपल्या पक्षाचे खासदार, आमदार लोकसभा/राज्यसभा आणि विधानसभा/विधानपरिषद जिवाचे रान करून प्रश्न मांडत असताना महायुतीचे विद्यमान खासदार आणि आमदार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मश्गुल आहेत.
महाराष्ट्राच्या हक्काच मागताना यांची तोंडे उघडत नाहीच पण इथल हक्काच उचलून दुसऱ्या राज्यात स्थानांतरीत होत असताना देखील मूग गिळून बसणारी प्रवृत्ती राज्यात वाढत आहे.
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी कार्य करण्याऐवजी ज्याचा राज्याच्या अधोगतीसाठी वापर होईल असे विषय प्रसारमाध्यमांवर मुद्दामहून आणून महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहचविण्याचे काम महायुतीमधील नेते मंडळी करीत आहेत. ही महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे.
महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ असल्यामुळे महायुतीचे हे सुरू असलेले काळे कारनामे आपल्याला जनतेसमोर वेळीच आणून देणे आवश्यक आहे.
महायुतीच्या या महाराष्ट्र द्वेषी धोरणाला कायमचा लगाम लावण्याकरिता ” महायुतीचे काळे कारनामे ” सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी निषेध आंदोलन केले..
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत , प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहाराध्यक्ष बालू वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, जावेद मिर्झा, उपसरपंच मंगेश गिरडे, उपसरपंच प्रवीण कलोडे, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, सुचिता सातपुते, विद्या गिरी, सुजाता
sharadpawar:जांभूळकर, दिपाली रंगारी, नालंदा राऊत, मंगला कुमरे मॅडम, अमिता पूनवटकर, सुनीता तामगाडगे, अजय परबत, सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, गणेश जोशी, , प्रल्हादजी तूराळे, राजू मेसेकर, उमेश नेवारे, बबलू खान, हेमंत घोडे, कुणाल येसंबरे, राजू मेसेकर, सचिन भडे, विपुल थूल, मोहम्मद शाहीद, बचू कलोडे, राजू सराटे, विपुल वाढई, पंकज भट्ट, प्रवीण भूते, सुशील घोडे, आकाश हूरले, गजानन महाकाळकर, सौरभ घोडखांदे, संकेत वंजारी चेतन येनोरकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…