शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार प्रेरणादायी….. संगितराव भोंगळ(Sharadpawar)

0
2

 

आज दि १२ १२ २००४ रोजी पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर्डा बु येथे मा. जि .प . उपाध्यक्ष संगितराव भोंगळ (राजु पाटील) यांनी शालेय विद्यार्थ्यांनसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती या निबंध लेखन स्पर्धेत जि प हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय विधार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले.

निबंध लेखन स्पर्धेत पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक श्रेया विजय वेरूळकर वर्ग दहावा, द्वतिय क्रमांक मोहिनी शुद्धधन वानखडे वर्ग बारावा, तृतिय क्रमांक हर्षल जितेंद्र वानखडे वर्ग दहावा, चतूर्थ क्रमांक मनीषा सुभाष खोंड वर्ग अकरावा, प्रोत्साहनपर बक्षीस पुनम प्रवीण गावंडे वर्ग आठवा,
यासह सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

पारितोषिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ राजु पाटील व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते आज प्राविण्य मिळवलेल्या विघार्थांना देण्यात आले यावेळी उपस्थित गणेश धर्माळ,रामेश्वर भड, इंद्रभान वानखडे, लक्ष्मण कुरवाळे, विष्णु पाटील,शिवलाल पवार, पप्पु पठाण,सुरेश वानखडे,प्रशांत अढाव, दिनेश वानखडे, गिरीष देवगिरकर, गजानन पुंडे, अनंत धर्माळ, अमित पाटील,शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Sharadpawar :यावेळी मा . जि.प. उपाध्यक्ष संगतिराव भोंगळ यांनी निबंध लेखन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
शालेय जीवनात विधार्थीना स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पढावी या करिता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्था वर्ग 8 ते 12 मधिल विद्यार्थी यांनी विषेश प्राविण्य व सहभाग घेऊन यशस्वी केल्याबद्दल सर्व शिक्षक मंडळी व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here