सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav )

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

sharadjadhav:जळगाव जामोद येथील सर्पमित्र शरद उखर्डा जाधव यांचा १७ जून रोजी ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम दिल्ली द्वारा पर्यावरण वन्यजीव संरक्षण आणि सर्पमित्र राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राजधानी दिल्ली येथील द्वारका सेक्टर मध्ये आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ग्लोबल ह्यूमन राइट्स फोरमचे राष्ट्रीय व्हाईस प्रेसिडेंट काशीराम पैठणे, फाउंडर चेअरमन महानंदा सरकार दत्ता, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉक्टर प्रकाश खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण क्षेत्र वन्यजीव क्षेत्र आणि सर्पमित्र म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शरद जाधव यांना यावेळी मान्यवरांनी सन्मानित केले.

यावल आदिवासी प्रकल्प अधिकारी पवार शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या तक्रार संबधित एक्शन मोड पर ( Yavalnews )

जळगाव जामोद येथील सर्पमित्र वन्यजीव आणि पर्यावरणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे जाधव हे एकमेव आहेत.

त्यांच्या या पुरस्कारामुळे तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांनी आतापर्यंत सर्पमित्र म्हणून ५ हजार सापांना जीवदान दिले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एवढेच नव्हे तर पर्यावरणासंबंधी विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. पर्यावरणाची लहानपणापासूनच आवड आहे त्यामुळे वन्यजीव पर्यावरण संरक्षण संदर्भात जनजागृती करणे सापांना जीवदान देऊन तो शेतकऱ्यांचा मित्र आहे हे लोकांना पटवून देणे तसेच सापांविषयी जनजागृती करणे हे काम ते गत पंचवीस वर्षापासून अविरत करीत आहेत.

sharadjadhav:त्यामुळे माझा झालेला सन्मान हा सर्व पर्यावरण प्रेमींचा सन्मान आहे. निसर्गावर प्रेम करा निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. असे सर्पमित्र शरद जाधव यावेळी म्हणाले

Leave a Comment