इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र
शेगाव : दि.15गेल्या 26 ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलना निमित्य भाऊबीजेच्या दिवशी जळगाव जा. मतदार संघांचे आ.डॉ.संजय कुटे ह्यांना ओवाळून आगळे-वेगळे आंदोलन करीत साहेब आम्हाला नियमित सेवेत सामावून घ्या हो! असे म्हणत साकडे घातले.
15 ते 18 वर्षे कंत्राटी स्वरूपाने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरु असून आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवाळीत येणाऱ्या भाऊबीजेच्या राज्यातील सर्व आमदार खासदारांना ओवाळण्याचे ठरविले होते.
तर ओवाळणी नंतर ताटात टाकलेल्या भेटीच्या स्वरूपात आम्हाला नियमित सेवेत सामावून घेत असल्याचे आश्वासन देण्याची ह्या कर्मचारी यांनी मागणी केली आहे
. ह्यावेळी तशा स्वरूपाचे निवेदन सुद्धा आ. कुटे यांना देण्यात आले. आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्व राज्यातील नियमित केल्याचे जीआर मला द्या मी आयुक्ता सोबत मिटिंग लावून तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन यावेळी दिले. आमदार संजय गायकवाड, यांच्यासह जिल्ह्यातील विविध मतदार संघातील आमदारांना आजच्या दिवशी ओवाळण्यात आले आहे.
या बाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत आझाद मैदानावर 30% कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने समायोजन करणार असल्याचे आश्वासन दिले असून लेखी स्वरूपात काहीही दिले नसल्यामुळे सदरचे आंदोलन 22 दिवशी आंदोलन सुरूच होते. आ.कुटे यांच्या भेटी दरम्यान परिसरातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. Sanjaykute