गावगुंडाने गोंधळ घालणाऱ्यांना शपथ घेऊन सांगतो की मी सोडणार नाही, माझं हिशेब अजून बाकी आहे – आ. संजय गायकवाड/ sanjay gaikwad 

 

sanjay gaikwad

गावगुंडाने गोंधळ घालणाऱ्यांना शपथ घेऊन सांगतो की मी सोडणार नाही, माझं हिशेब अजून बाकी आहे – आ. संजय गायकवाड/ sanjay gaikwad

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात दिवाळीच्या दिवशी एका गटाने गावात गोंधळ घातला. परंतु मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाके फोडून तिची छेड काढण्यात आली. एवढेच नाही तर मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांनी लाठ्या-काठ्या आणि दगडांनी पण मारहाण केली.

यासह घरात घुसून सामानाची मोडतोड केली.या दरम्यान, याची माहिती मिळताच शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड 40-50 वाहने व शेकडो कार्यकर्त्यांसह घटनास्थळी त्या गावात पोहोचले आणि घराचा आढावा घेतला.

25 ते 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जामिनावर बाहेर आल्यास आरोपीला पकडून जीवे मारण्याची धमकी आमदार संजय गायकवाड यांनी दिली. परंतु पीडितेचे कुटुंबीय आमदार संजय गायकवाड यांचे नातेवाईक आहेत. व या संपूर्ण प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात २५ ते ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. संजय गायकवाड म्हणाले की, रविवारी संपूर्ण राज्यात आणि देशात दिवाळी साजरी होत होती म्हणुन मी काही नाही करता मेहकरमध्ये काही मुस्लिम गटाने माझ्या भाचीवर जो हल्ला केला. त्यांचा द्वेष फक्त धर्माचा आहे की आपण देवीचा स्टेटस का ठेवतो, देवळात देवीची गाणी का वाजवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस का ठेवतो.

घरावरही मोठे दगडफेक करण्यात आली मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

संजय गायकवाड म्हणाले, “ज्यांच्यावर हल्ला झाला ते पूर्णपणे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरावरही मोठे दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली. मला एवढेच सांगायचे आहे की पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जर दिवाळी झाली नसती तर मी या लोकांना तोडून फोडून ठेवले असते. शेवटी आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत, पण मला पोलिसांची आणि जिल्ह्याची दिवाळी खराब करायची नव्हती म्हणून मीही सगळे टाळले. या लोकांना जामीन मिळाल्यावर मी कुणालाही तोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझा जात आणि धर्माला विरोध नाही, पण मी अशा प्रवृत्ती सोडणार नाही. सूर्या मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा Sanjay gaikwad

Leave a Comment