बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात(samruddhi mahamarg)

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

समृद्धी महामार्ग:बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला, जेव्हा मुंबईतून अकोल्याकडे जात असलेल्या कारचा अचानक स्फोट होऊन ती पेट घेतली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

अपघाताची घटना अशी घडली की नागपूर कॅरिडोरवरून जात असलेल्या कारचे चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) यांचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे कार मिडीयममधील क्रॅश बॅरिअरला धडकून त्याची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार निघाली.

यानंतर कारने तात्काळ पेट घेतले आणि प्रवाशांना बाहेर निघता न आल्याने अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२, दोन्ही रा. मुंबई) यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. चालक अभिजीत हा गंभीर जखमी झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अपघातानंतर महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले. अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीम व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या अवस्थेत कारमधून बाहेर काढले.

समृद्धी महामार्ग:किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे मनीषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करीत आहेत. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment