अक्रम रेघीवाले कारंजा तालुका प्रतिनिधी
कारंजा शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जात होते, काही वर्षांपूर्वी शासनाने गुटखा, सुगंधीत तंबाखू वर बंदी घातली आहे,
गुटखाबंदीचा आदेश हा केवळ कागदापुरताच र्मयादित राहिला आहे की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, कारंजा शहरामध्ये सर्रास शासनाने राज्यात गुटखा बंदी केली आहे.
मात्र, कारंजासह जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे अवैध गुटखा विक्रीवरून दिसून येते.
इमोशनल जोडीदाराला सांभाळण्याची झक्कास ट्रिक, नक्कीच वाढेल नात्यातील गोडवा (Love )
कारंजा हे तस्करीचे प्रमुख केंद्र मानल्या जात आहे. हा गुटखा दुचाकी आणि चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तस्करी करणारे वाहन हे कारंजा पर्यंतच येते. तेथून जिल्हाभर गुटख्याचे वितरण होत आहे.
त्यामुळे गुटख्याची छुप्या विक्रीही अव्वाच्या सव्या भावाने होत आहे. यावर आता निर्बंध कोण घालणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गुटखा विक्रेत्यांवरील कार्यवाही हि फक्त चिल्लर विक्री करणाऱ्या वरच होत आहे का? म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी काहीशी स्थिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची झाली असल्याची चर्चा आहे.
कारंजाचे तत्कालीन तहसिलदार धिरज मांजरे यांनी एक मोहीम हाती घेऊन कारंजा शहरातील लाखो रुपयाच्या गुटखा गोदामावर धाडी टाकुन मोठ मोठे गोडावुन सिल केले होते,
चॅनेल व्हाटसप ग्रुप आताच जॉईन्ड करा
त्यावेळी फीरोज नावाच्या व्यक्तीवर ही कार्यवाही करण्यात आली होती, तेव्हा पासुन आज पर्यंत गेल्या एक वर्षात अवैध गुटखा विक्री करणार्या मुख्य तस्करावर कार्यवाही केल्याचे दिसत नाही,
rkgutkha: ज्या कारंजा शहरात लाखो रुपयाचा गुटखा जप्त केला जावु शकते तर आज ही जागो जागी गुटखा सहज मिळते तर मग कार्यवाही का होत नाही असा प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहे