Reserve Bank / रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या फिंटेक विभाग तसेच SEBI(सेबी) मध्ये निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्र कडुबा पवार यांचा किंनगाव राजा येथे सत्कार!

 

इस्माईल शेख बुलढाणा जि. प्र

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत या छोट्याशा गावातील जिजाऊच्या लेकाने पहिल्याच प्रयत्नात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महत्वाच्या अशा फिंटेक विभाग तसेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) येथे निवड झाली आहे.

तालुक्यातील शेलगाव राऊत या छोट्याशा गांवातील श्री राजेंद्र कडूबा पवार यांनी वयाच्या २८ व्या वर्षी अवघड अश्या परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन अथक प्रयत्नातून सर्व काही शक्य आहे हे राजेंद्र यांनी सिद्ध केले आहे,

राजेंद्र पवार यांची संपूर्ण भारतातून होत असलेल्या खुल्या प्रवर्गातून निवड झाली आहे. राजेंद्र यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, चिकाटीने राजेंद्र यांनी हे यश संपादन केले आहे.Reserve Bank

त्यानिमित्त आज श्री राजेंद्र पवार व त्यांच्या यशात अप्रत्यक्ष मोलाचे योगदान देणारे त्यांचे वडील श्री कडुबा पवार यांचा छोटेखानी सत्कार समारंभ आज किनगांव येथे डॉ.ज्ञानेश्वर पातुरकर यांचे निवासस्थानी पार पडला. या प्रसंगी पवार कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध असणारे त्यांचे मित्रमंडळ सर्वश्री खुशालराव नागरे, गजानन हरकळ, ज्ञानेश्वर कुटे,राहुल शिर्के,राजेंद्र राऊत,संदीप घिके,श्रीमंत राऊत,डॉ दीपक पवार,डॉ ज्ञानेश्वर पातुरकर योगेश राऊत आदी उपस्थित होते…Reserve Bank

Leave a Comment