पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

 

Ravikanttupkar:मुंबई, मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात् शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

आपण सातत्याने केलेल्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पिकविमा कंपनीने सन 2023 च्या खरीप हंगामातील पात्र 2 लाख 24 हजार 482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 138 कोटी 51 लाख रु. पिकविमा जमा आहे. तर रब्बी हंगामातील पात्र 56 हजार 989 शेतकऱ्यांच्या खात्यावर 125 कोटी 22 लाख रुपये पिकविमा कंपनीने जमा केला आहे.

 

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

 

परंतु रब्बी हंगामात पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाही, त्याचबरोबर खरीप हंगामातील 70 हजार 831 शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग व अपात्र अशा 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करावा, ही आपली मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे सरकारने कंपनीला उर्वरित रक्कम अदा करून तातडीने पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे, त्याचबरोबर पिकविमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पिकविमा कंपनीवर कठोर कारवाई करावी,

Ravikanttupkar:अशी मागणी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना कृषी प्रधान सचिव जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

Leave a Comment