Ranjit Kasle/ वादग्रस्त PSI रणजीत कासलेला बडतर्फी; बीड पोलीसांच्या ताब्यात

0
232

 

Ranjit Kasle:बीड येथील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्या राजकीय आणि व्यावसायिक कारवाया राज्यात खळबळ उडवून दिल्या आहेत.

सध्या संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार त्याला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११(२)(ब) अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, बीड पोलिसांनी त्याला पुण्यातील स्वारगेट येथून ताब्यात घेतले आहे.

Ranjit Kasle / रणजीत कासलेच्या आरोपानंतर राजकारणात भयंकर खळबळ

रणजीत कासलेवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याने फेक एन्टाऊंटर, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते,

ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सुरतच्या एका व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरणही त्याच्या तपासात असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांच्या तपासणी दरम्यान कासलेवर आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीडच्या भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलिसांत कासलेविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली.

त्यानंतर १४ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला, आणि १७ एप्रिल रोजी त्याला अधिकाऱ्यांकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

कासलेने मागास जातींबाबत वादग्रस्त वक्तव्यही केले असून, यामुळेही त्याच्याविरुद्ध बड्या प्रमाणात आवाज उठले. सध्या तो बीड पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.

त्याच्या आरोपांची चौकशी करायची की नाही याचा प्रश्न राजकीय व कायद्यानुसार गांभीर्याने विचाराधीन आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात अशा आरोपांना कितपत विश्वास ठेवावा यावर मत व्यक्त केले आहे.

Ranjit Kasle:रणजीत कासलेच्या कारवायांनी राज्यातील पोलीस व्यवस्थेत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here