प्रतिनिधी सचिन वाघे
Ram Navami /हिंगणघाट:- श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
श्रीराम मंदिरात वर्षानुवर्षे असलेल्या परंपरेने सुरू रामलल्लाचा पाळणा गाऊन विधिवत पुजा अर्चना करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो रामभक्तांनी गुलाल उधळून एक दुसऱ्याचे अभिवादन केले.
Ram Mandir /श्री राम मंदिर देवस्थान संम्पती भाडे करारनामा रद्द व गैरव्यवहाराची चौकशीची मागणी
शोभायात्रेत पौराणिक कथेवर आधारित देखावे, महिला भजन मंडळ, ढोलपथक, प्रभु श्रीराम दर्शन, बाहुबली हनुमान झाकी, मातृशक्तीसह रणरागिणी मैदानी खेळ, आकर्षक गोंडी नृत्य, श्रीराम दरबार दर्शन व आकर्षक रोषणाईसह सामाजिक व सांस्कृतिक शोभयात्रेचा समावेश होता.
शहरात एकूण चौदा शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभयात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित दर्शवली.राष्ट्रवादी चौक येथे अतुल वांदिले मित्रपरिवार तर्फे सरबत वाटप करण्यात आले.
तसेच सराफा असोसिएशन तर्फे महाप्रसाद वाटपाला भेट दिली.भक्तिमय वातावरणात जिकडे तिकडे प्रभु श्रीरामचंद्रचा जय घोषाने संपूर्ण हिंगणघाट दुमदुमून गेले होते.
Ramnavami :याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर,सुनील भुते, गजु महाकाळकर, बच्चू कलोडे,प्रवीण भुते,अरविंद रघाटाटे,किशोर चांभारे, परम बावणे,सुनील घोडखांदे,रमेश चतुर, बबलू शेख, सुशील घोडे, राहुल जाधव, वैभव साठोने,विपुल वाढई,कुणाल घोल्हर आदी उपस्थिती होते.