प्रतिनिधी :- सचिन वाघे
Ram Mandir:हिंगणघाट :- राम मंदिर वार्ड येथील पुरातन
श्री राम मंदीर देवस्थान यांचे जैन मंदीर वार्ड येथे नझूल शिट. क्र. 19 ब्लॉक न 10 प्लॉट नं, 88/1 व्यावसायिक देवस्थान मालकीचे आहे.
या प्लॉट चे रजिस्टर्ड भाडे पत्र करारनामा अध्यक्ष अनिरुद्ध भांदकर यांनी दि. 18 ऑगस्ट 2022 कमलकिशोर मेघराज रांका यांच्या नावाने नवीन रजिस्टर्ड भाडे पत्र करारनामा दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचे कार्यालयात केला आहे.
Manikrao Kokate/ माणिकराव कोकाटे यांचे वादविवादित विधान: शेतकऱ्यांना माफी मागितली आणि वाद संपला?
अध्यक्ष यांनी भाडेकरू बरोबर संगनमत करून रजिस्टर्ड भाडे पत्र केले करारनामा दि. 18.08.2022 ला कमलकीशोर मेघराज रांका यांच्या नावाने नोंदणी केली आहे. त्यामध्ये रजिस्टर्ड भाडेपत्र करारनामा लागू करण्याची मागील महिन्यातिल तारखे पासून 01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 पर्यन्त तीन वर्षा करीता करण्यात आली आहे. हा करारनामा मध्ये रजिस्टर्ड केल्या तारखेच्या मागच्या 8 महीने पूर्वेच्या तारीख पासून लागू केला आहे.
तसेच, आजच्या मार्केट भावानुसार भाडे पत्रा मध्ये अत्यंत अल्प दर 2000/- रुपये प्रती महिणा भाडे पत्र करारनामा करण्यात आला आहे. याचा अगोदर ही जागा नगर पालिका रेकॉर्ड मध्ये भाडेकरू पुखराज मेघराज रांका यांच्या नावाने होती. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्यामुळे व्यवसाईक प्लॉट चे भाडेपत्रा मध्ये मोठा गैरव्यवहार झालेला दिसून येते.
भाडेपत्राची दुय्यम निबंधक कार्यालय हिंगणघाट मधून सत्यप्रत काढलेली आहे त्यामध्ये धर्मादाय आयुक्तची कोणतीही रीतसर परवानगी चे पत्र व विश्वस्त मंडळाची ठराव प्रत दिसत नाही.
Ram Mandir:या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य भाडे पत्र करारनामा रद्द करण्यात यावा व होणारे देवस्थानाचे संपतीचे नुकसान वाचवण्यात यावे अशी मागणी वर्धा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कडे सचिन वाघे यांनी केली.