इस्माईल शेख बुलढाणा प्रतिनिधी
शेगाव.डॉ. बाबासाहेब. आंबेडकर विचारमंच महाराष्ट्र राज्य.पुणे शाखेचा वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कवि संमेलनाचे कलाप्रसाद सभागृह पुणे येथे करण्यात आले होते.यावेळी विविध क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर कवींना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार २०२३ देण्यात आला.
यात शेगाव येथील कवयित्री शितल शेगोकार यांना देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन संमेलनाचे अध्यक्ष विजय वडवेराव,डी.बी.ओ.संस्थापक मनोज जाधव,उपाध्यक्षा भावना खोब्रागडे,कवी राजू लहिरे आदी.मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
कवयित्री शितल शेगोकार ह्या सद्या शेगाव येथील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून कार्यरत असून पत्रकार व कवयित्री आहे तसेच अमरावी विभाग व बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण महिला,उज्जैनकर फाउंडेशन, गिरणा गौरव गिरजा महिला मंच,राष्ट्रीय स्वतंत्रता संघ नईदिल्ली,स्त्री शक्ती मंच आशा विविध संघटना व संस्थेचे मुख्य पदे भूषवत आहे त्यांच्या ह्याच बहुआयामी कार्याचा विचार करून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे.
श्रीमती शेगोकार यांचे सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे केंद्रीय मानवाधिकार संस्था संस्थापक प्रल्हाद तांदळे व अंगणवाडी कर्मचारी वृंद,पत्रकार संघ व विविध संघटनाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे. Pune