विजयराज शिंदेच्या नाराजी नाट्यावर पडदा! खासदार व शिंदेंचे मनोमिलन;जाधव आणि शिंदेची ‘चाय पे चर्चा’! प्रचाराची धुरा ताकदीने सांभाळणार- शिंदे ( Pratapraojadhav )

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्येच मतभेद चव्हाट्यावर आले होते.Pratapraojadhav:

परंतू उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे.

दरम्यान खा. प्रतापराव जाधव यांनी भाजपाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन तब्बल एक तास शिंदेंसह कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मतभेद निकाली काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणेच चाय पे चर्चा अर्थात टी डिप्लोमसीद्वारे त्यांच्या दिलजमाई झाली.

यावेळी भाजपाच्या आ. श्वेता महाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मान्टे यांच्यासह भाजपचे काही निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या निवासस्थानीच यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद केली. यावेळी बोलतांना खा. प्रतापराव जाधव यांनी आमचे मनोमिलन झाले आहे.

आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून…( sanjaygaikwad )

कौटुंबिक पातळीवर जसे मतभेद असतात तसे मदभेद टी डिप्लोमसीमध्ये (चाय पे चर्चेत) दूर झाले आहेत. आमच्या मतभेद असले तरी मनभेद नव्हते. महायुतीमधील १५ घटक पक्षांनी एक मताने मोदींचा ‘अबकी बार ४०० पार’ चा नारा यशस्वी करण्यासाठी एकदिलाने व एकमताने काम करण्याचा निर्णय घेतल्याचेही खा. जाधव म्हणाले.

आमचे काही धुऱ्याचे भांडण नव्हते तसेही राजकारणात ते नसते. आ. गायकवाड व विजयराज शिंदे यांच्यामध्ये दिलजमाईसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. कुणी कुणाला अपशब्द वापरणे योग्य नाही. त्याचे समर्थन करणेही अयोग्य असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी आ. गायकवाड आणि शिंदेंमधील शाब्दीक चकमकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले. महायुती घट्ट, मजबूत व एकजूट आहे. महायुतीचे जिल्ह्यात सहा आमदार आहे. गेल्या १५ वर्षापासून आपण निवडून येत आहोत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे आमच्या स्पर्धेत कोणी नाही, असे ही जाधव यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना-भाजप युती ही १९९० पासून आहे. त्यात अनेक निवडणुका आम्ही एकत्र लढल्याचेही त्यांनी सांगितले. आम्हा भावांमध्ये कुणी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले.

प्रचाराची धुरा सांभाळू-शिंदे

पत्रकार परिषदेमध्ये आपण महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खा. जाधव साहेबांनी प्रचाराची धुरा आपल्यावर सोपविल्यास आपण निश्चितच ती धुरा सांभाळू असे शिंदे म्हणाले.

Pratapraojadhav:दरम्यान खा. जाधव आणि विजयराज शिंदेंमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळेमुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचे चित्र आहे.

Leave a Comment