इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा
prashantdikkar:शेगाव/ जिगाव प्रकल्पातील जमिनीला एकरी ४० लाख रुपये मोबदला द्यावा. व शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा. या मागणीसाठी प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिक्षक अभियंता कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयातच संबंधित अधिकाऱ्यांसोबत शातंतेत चर्चा सुरू असतांना.
ठेकेदारांनी पाठवलील्या माणसांनी अचानक कार्यालयात येऊन प्रशांत डिक्कर यांच्या सोबत थेट वाद घातला. घाणेरडे आरोप करीत शिवीगाळ केली. शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी ४० लाख रुपये मोबदला द्यावा व ठेकेदारांचा बंदोबस्त करा. त्यामुळे हा सर्व प्रकार ठेकेदारांच्या चांगलाच जिव्हारी आल्यामुळे ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार नियोजित घडवून आणला असल्याचे बोलल्या जात आहे.
FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात
दरम्यान शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेब नितीन पाटील यांचे सह जाधव साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी वाद विकोपाला न जाता वातावरण शांत केले.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर व भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना ठेकेदारांनी कितीही रोखण्याचे काम केले असले. तरीसुद्धा हा लढा थांबणार नाही.
FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात
prashantdikkar:असे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना सांगितले. जोपर्यंत प्रकल्पातील जमिनीला शेतकऱ्यांना एकरी ४० लाख रुपये मोबदला मिळत नाही. व भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. असा इशारा अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाला प्रशांत डिक्कर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.