prashantdikkar:संग्रामपूर- जळगाव-जामोद मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांचा मतदार संघातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तिनही तालुक्यातील गावागावात झंजावती प्रचार दौरा अविरत सुरू आहे. तर मतदारांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत असून तसे त्यांचे कार्यकर्तेही खाजगीत बोलत आहेत.
प्रशांत डिक्कर हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी मागील 16 वर्षापासून अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे मतदार संघासाठी नवखे उमेदवार नाहीत तर संकटाच्या समयी धावून येणारा जनसेवक असल्याचे मतदार बोलत आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या मतदारांना प्रशांत डिक्कर यांच्या रूपाने पर्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांचे गावागावात जंगी स्वागत होत आहे. मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांची विजयी घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात काही ग्रामस्थ त्यांना वर्गणी देऊन निवडणुकीसाठी आर्थिक सहकार्य करत आहे.
वाढता प्रचार, नागरिकांचा प्रतिसाद आणि विजयाकडे वाटचाल बघता विरोधी उमेदवारांना प्रशांत डिक्कर या नावाची धास्ती बसल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे.
prashantdikkar:-जनतेसाठी लढणारा, जनतेसाठी झाटणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत जावा, अशी इच्छा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबर रोजी क्रमांक 5 वरील ‘सात किरणांसह पेनाची नीब’ या चिन्हसमोरील बटन दाबून प्रशांत डिक्कर यांना प्रचंड बहुतांताने विजयी करावे असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.