prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला बचत गट,व युवकांच्या प्रश्नावर केलेल्या १६ वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एंट्री केल्याने विरोधक चांगलेच धास्तावले आहेत.
याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित मतदार संघातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष उज्वल पाटिल चोपडे यांच्या सुचनेनुसार संग्रामपूर येथिल रेणुका माता मंदिर परिसरात दणकेबाज बैठक पार पडली.
यावेळी सर्वांचे मत ऐकून घेण्यात आले त्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांना प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. २० वर्ष गोरगरिबांचे रक्त पिऊन सत्तेची मस्ती घेऊन पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या रणभूमीवर लढाईसाठी उतरलेला शेतकरी विरोधी उमेदवारांना चितपट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा अशा सुचना देण्यात आल्या.
परिस्थितीवर मात करण्यासाठी एक नोट एक वोट या पध्दतीने लोकवर्गणीतून चंदा जमा करून निवडणुकीसाठी लागणारी सामुग्रीवर खर्च करु असा निर्णय घेण्यात आला. या होणाऱ्या खर्चासाठी कार्यकर्त्यांच्या निवडक समित्या गठीत करण्यात आल्या. मतदान पेटी बंद होई पर्यंत प्रचार संबंधित सर्व जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना वाटुन देण्यात आल्या.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच सोमवार दि २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. जळगाव मतदार संघातील जणतेला २० वर्षाच्या वनवासातुन मुक्त करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांच्या रुपाने मतदार संघातील अहोरात्र शेतात राबणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत निरोप पोहचवा.कष्टकरी मायबाप जणतेला ही चांगली संधी मिळाली आहे.
prashantdikkar:या संधिचे सोने करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असा विश्वास देण्यासाठी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा अशी शिस्तबद्ध निवडणुक नियोजनाची बैठक पार पडली या बैठकीला मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.