कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! प्रशांत डिक्कर
prashantdikkar:शेतकरी शेतमजुरांसाठी फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात लाभ काहीच नाही. अशा अवस्थेची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.
त्याची सुरुवात आज दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी संत गोमाजी महाराज श्री क्षेत्र नागझरी येथून करण्यात आली. त्यासाठी आज पासून पुढील १५ दिवस शिव जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेगाव संग्रामपूर जळगाव या ३ तालुक्यातील १९१ गावातून ही यात्रा जाणार आहे. आज श्री संत नगरी नागझरी येथे गोमाजी महाराजांच्या चरणी माता टेकवून विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शुभारंभाची नारळ फोडला यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उज्वल पाटील चोपडे , सय्यद बाहोद्दीन, गोपाल तायडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ही यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे.
आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews )
जळगाव जा. विधानसभा मतदार संघ भ्रष्टाचार मुक्त करून शेती मातीची नाळ जोडलेल्या शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्याचा संकल्प या यात्रेतून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रस्थापिता विरोधात दंड थोपटून यात्रेच्या आयोजन केलेल्या स्वाभिमानीच्या या कार्याला प्रत्येक गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे पहिल्याच दिवशी दिसून आले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या कापसाला १५ हजार तर सोयाबीनला ९ हजार रुपये भाव द्या सोयाबीन व कापसाच्या गाठी आयात करू नका मागील वर्षीचा पिक विम्याची थकीत रक्कम, व यावर्षी मोठ मोठ्या बैठका घेऊन पीक विम्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे शुद्ध धूळफेक आहे,
म्हणून पीक विम्याचा लाभ देऊन सरकारने शब्द पाळावा शेतमजूर कल्याण मंडळाची स्थापना करा , संग्रामपूर जळगाव तालुक्यात उद्योग उभे करून बेरोजगारांच्या हाताला काम द्या, अशा एकूण १३ मागण्या या यात्रेतून करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा डाव या सरकारचा असून तसे झाल्यास गोरगरिबांचे मुले शिकणार कुठे असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या यात्रेतून प्रस्थापित सरकारला विचारला आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासी बांधवांना जातीचे दाखले नाहीत जळगाव जा. तालुक्यात अनुदान वाटपात ४ ते ५ कोटीचा घोटाळा झाला, अनुदान भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटून पात्र शेतकरी उपाशी ठेवल्या गेले, असे एक नव्हे तर शेकडो समस्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जन स्वराज्य यात्रेचे हत्यार उपसले आहे,
prashantdikkar:स्वाभिमानीच्या म्हणण्यात सत्यता असल्यामुळेच जनतेतून या यात्रेला भक्कम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे २० सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजुरांचा महामेळावा घेऊन या यात्रेचा संग्रामपूर येथे समारोप होणार आहे. यावेळी स्वाभिमानी चे प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..