इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा
Prashantdikkar:शेगांव/ शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांची स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यानी स्वराज्य पक्ष मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुशजी कदम (मुंबई) यांचे प्रमुख उपस्थित प्रशांत डिक्कर यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशांत डिक्कर हे बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर लहानशा बोडखा गावातुन समोर आलेले नेतृत्व आहे. कोणताही राजकीय वारसा नसतांना परिस्थितीवर मात करीत १६ वर्षांपासून शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर संघर्ष करीत प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात आपली ओळख निर्माण केली.
DrbaBasahebAmbedkar/बाबासाहेब आंबेडकर: आंबेडकर हे आडनाव कसे पडले?
राज्यात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीतील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदारसंघातुन मैदानात उतरले होते. खंबीरपणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी सभांजीराजे सर्वशक्तीनिशी उभे राहिल्याने हि निवडणुक चांगलीच प्रतिष्ठेची ठरली होती.
या निवडणुकीत प्रशांत डिक्कर निवडुन आले नसले तरी मताधिक्य चांगले प्राप्त केले होते. त्यामुळे आजचा योगा योग असावा वाढदिवसाचे औचित्य पाहून आज दि.१४ एप्रिल रोजी सभांजीराजेंनी प्रशांत डिक्कर यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून स्वराज्य पक्ष किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे सांगितले आहे.
Prashantdikkar:राज्याची जबाबदारी मिळाल्याने महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाच्या विस्ताराला एक मोठी वाट मोकळी झाली असुन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढाऊ नेतृत्वाला योग्य संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वस्तरातून कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर वर्गातुन प्रशांत डिक्कर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.