लग्न वरात व ईतर मिरवणुकीचे बँन्ड / लाऊडस्पीकर चालक मालकांनी नियमांचे पालन न केल्यास होणार कार्यवाही.(policenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहा अमिन शेख

Policenews :शेगाव.पोलीस स्टेशन सोनाळा अंतर्गत ग्राम टुणकी येथे काही दिवसांपुर्वी लग्न वरातीमध्ये घडलेल्या अप्रीय घटणेमुळे तेथे कायदा व सुव्यस्थेची परीस्थीती निर्माण झाली होती. त्यात पोलीस स्टेशन सोनाळा येथे संबंधीतांवर गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आले होते. भविष्यात लग्न वरातीमध्ये किंवा कुठल्याही इतर मिरखुणकीदरम्यान बँन्ड / लाऊडस्पीकर चालक मालक यांचेकडुन नियमांचे उल्लंघन होऊ नये,

याची दक्षता घेण्यासाठी मा. श्री. सुनिल कडासने (पो.अ.सा. बुलडाणा), मा. श्री. अशोक थोरात (अ.पो.अ.सा. खामगांव) व मा. श्री.विनोद ठाकरे (उपविभागीय पोलिस अधीकारी खामगांव) यांचे सुचनेप्रमाणे श्री. हेमंत ठाकरे, ठाणेदार पो.स्टे. शेगांव शहर यांनी दिनांक 30/04/2024 रोजी बँन्ड / लाऊडस्पीकर चालक – मालक यांचे मिटींगचे आयोजन केले होते. सदर मिटींगमध्ये शेगांव शहर व आजु बाजुचे गांवातील बँन्ड / लाऊडस्पीकर चालक मालकांनी उपस्थीती नोंदविली होती. सदर मिटींगमध्ये ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी लग्न समारंभाचे तसेच इतर मिरवणुकीचे आयोजकांनी पोलीस स्टेशनला रितसर अर्ज सादर करुन परवानगी काढली असेल.

तरच बँन्ड / लाऊडस्पीकर चालक मालक यांनी वाद्य वाजवावे असे निर्देश दिले आहेत. तसेच मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, मिरवणुक वाद्यांमुळे ध्वनी प्रदुषन होणार नाही, कायद्याचे उल्लंघन होणार नाही, मिरवणुकीतील गायन वाद्यामुळे कोणाच्या धार्मीक भावना दुखावनार नाही, ठरवुन दिलेला मार्ग बदलनार नाही,

पश्चिम बंगालच्या कामगाराची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप! गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल ( highcourt )

मुद्दामहून संमीश्र वस्ती किंवा ईतर धर्माच्या प्रार्थनास्थळा जवळ विनाकारण मिरवणुक रेंगाळणार नाही. जेणेकरुन सार्वजनीक शांततेला बाधा पोहचुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत बँन्ड लाऊडस्पीकर चालक मालक यांना कलम 149 Cr.p.c. नोटीस तामील करण्यात आली आहे.

Policenews :त्याच प्रमाणे लग्न् कार्य व ईतर मिरवणुकीचे आयोजक यांनी देखील याकामी सहकार्य करावे व रीतसर बँन्ड / लाऊडस्पीकर वाजवीण्याची परवानगी घ्यावी. असे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment