इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा
Policenews:शेगाव येथील एका रेडीमेड कापड दुकान चालवणाऱ्या तरुणावर तीन जणांनी हॉटेलमध्ये जेवण करत असताना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित चंद्रकांत पातुरकर (वय 26, रा. शंकर राजेश्वर कॉलनी, शेगाव) हे ‘आयकॉनिक रेडिमेड’ नावाचे कपड्यांचे दुकान चालवतात. दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी हरीश पारखेडे यांनी त्यांच्या दुकानात येऊन एक पँट बदलण्याची मागणी केली होती. मात्र, पँट फाटलेली असल्याने फिर्यादीने परत घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने संताप व्यक्त केला.
दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजता, फिर्यादी रोहित पातुरकर हे गौरव झाडोकार व ओम नांदोवार यांच्यासोबत आठवण हॉटेलमध्ये जेवत असताना, आरोपी हरीश पारखेडे, राम चव्हाण, निखिल पारखेडे व एक अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
Policenews:घटनेनंतर फिर्यादी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी रिपोर्ट दिला. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 118(1), 296, 3(5), 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा तपास पो. कॉ. करुटले यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.