Policenews / आंदोलनाच्या मागण्यांची पूर्तता नाही तर आंदोलन तीव्र होईल

0
14

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील नागरी समस्यांवर आंदोलनाचा जोर

Policenews:बुलढाणा जिल्ह्यातील विविध नागरी समस्यांवर आंदोलनाची चळवळ जोरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी जिजामाता स्टेडियमवरील प्रांगणात 22 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

cbse-curriculum-in-maharashtra-schools / राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय: एक नवीन दिशा

या आंदोलनात जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांसह एकूण अकरा ज्वलंत समस्यांचा समावेश आहे.

आंदोलनाच्या मागण्या

आंदोलनाच्या मागण्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी घातलेली बंदी त्वरित उठवणे, जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करणे, शहरातील प्रत्येक चौकात महिलांसाठी मोफत शौचालयाची व्यवस्था करणे, गहाळ झालेल्या मुलामुलींचा शोध घेणे, जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, उपवनसंरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करणे, अनधिकृत रेती वाहतूक बंद करणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे वापस घेणे यांचा समावेश आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील, प्रदेश महासचिव संजय येडोले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकुब खा पठाण, अल्पसंख्यांक पीछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे आणि आझाद हिंद महिला संघटनेच्या पंचफुलाबाई गवई यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

Policenews :48 तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here