बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांची धडाकेबाज कारवाई.
प्रतिनिधी सय्यद जहीर
policenews:दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी दिग्रस येथून मुंबई येथे जाण्याकरता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच. 29 बी. इ.67 77 ही मेहकर कडून समृद्धी महामार्गाने जात असताना पोलीस स्टेशन समृद्धी महामार्गावर असलेला देऊळगाव कोळगाव गावाजवळील ओव्हरहेड ब्रिजवरून अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्स वर दगड फेकून मारले होते.
त्यात ट्रॅव्हलचा समोरील काच फुटून ट्रॅव्हलचालक व इतर दोन तिघे जणांना मार लागून दुखापत झाल्या होती. वाहन चालकाने वाहन नियंत्रणात ठेवल्याने सुदैवाने जीवित टळली होती. सदरचा गंभीर प्रकार करून अज्ञात आरोपी पसार झाले होते. सदर बाबत माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 29 बी ई 67 77 चे मालक भिकूसिंग भानावत राहणार दिग्रस जिल्हा यवतमाळ यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बिबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये मा .पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा श्री विश्व पानसरे ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा श्री बी.बी. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मेहकर प्रदीप पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप पाटील पोलीस ,हेड कॉन्स्टेबल अरुण मोहिते, नापोका अरुण सानप, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत जैवळ हे तपास करत
असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे rp ट्रॅव्हल्स एजंट तेजराव उर्फ रवी भगवान शिरसाट राहणार पारडी शिरसाट यास दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सुलतानपूर येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन कसोशीने विचारपूस केले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर राम नारायण दिगंबर चव्हाण राहणार खापरखेड घुले रामभरोसे हॉटेल मालक यांच्याकडील कामगार शेख जावेद शेख रफिक राहणार बीबी ,शुभम रामेश्वर आटोळे राहणार बीबी रंगीला बार चालक यांनी माही ट्रॅव्हल्सवर पुलावरून दगडफेक केली असून त्याने माही ट्रॅव्हल्स ही मेहकर वरून जालना दिशेने निघाल्याची माहिती फोनवरून दिल्याची कबुली दिली .त्यावरून सर्व चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस स्टेशन बिबी पोलीस पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याचे पूर्व नियोजित कट रचून गुन्हा केल्याची माहिती उघड झाली .त्यातील आरोपी एक रामनारायण दिगंबर चव्हाण वय 45 वर्ष राहणार खापरखेड घुले तालुका लोणार यांची बिबि सुलतानपूर रोडवर रामभरोसे हॉटेल असून सदर हॉटेलवर रात्रीचे वेळेस ट्रॅव्हल जेवण करतात थांबत असल्याने सुमारे एक वर्षांपूर्वी पर्यंत माही ट्रॅव्हलच्या गाड्या देखील रामभरोसे हॉटेलवर थांबत असतात. परंतु मागील काही राम नारायण चव्हाण व माही ट्रॅव्हलचे मालक यांच्यात वाद झाले. त्यानंतर पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे रामनगर राम नारायण चव्हाण व दिलीप रुडे यांनी माही ट्रॅव्हलच्या बॅटरी तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरी केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध माही ट्रॅव्हल्स चे मालकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता.
स्थानिक व निष्ठावंतास मेहकर विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीची संकेत(mehkar)
त्यानंतर माही ट्रॅव्हल्स हॉटेलवर थांबणे बंद होऊन इतर ट्रॅव्हल देखील थांबणे कमी झाल्याने वाटेल व्यवसायावर परिणाम झाल्याने सदर बाबीचा रामनारायण चव्हाण यांचे मनात राग होता .त्यातून त्यांनी ट्रॅव्हलचा चालक यांना तुम्ही तिकडे आले तर तुमच्या गाड्या फोडून तुम्हाला जीवाने ठार मारतो अशा धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालत नसल्याने नाम नारायण चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी त्याचा रंगीला वाईन बार हा आरोपी शुभम आटोळे व रामभरोसे हॉटेल इतर व्यक्तीस चालविण्यास दिले होते व आरोपी ज्यावेळेस शेख हा त्याच्याकडे कामावर होता तसेच आरोपी रवी शिरसाठ उर्फ तेजराव हा ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत असल्याने त्याचे व रामनारायण चव्हाण यांची मैत्री होती. यावरून घटनेच्या दोन-तीन दिवस अगोदर आरोपी रामनारायण चव्हाण यांच्या रामभरोशी हॉटेलवर सर्व आरोपी थांबलेले असताना रामनारायण चव्हाण यांनी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला व त्यांच्यामुळे माझे नुकसान झाले त्यांना आता बघतो असे म्हणून इतर आरोपींना मदत करण्यास सांगितले त्यावेळी सर्व आरोपींनी माही ट्रॅव्हल्स फोडण्याचा तसेच ट्रॅव्हल चालत या जीवाने ठार मारण्याचा कट रचला त्यावेळी आरोपी
रामनारायण चव्हाण यांनी इतर आरोपींना त्याने माही ट्रॅव्हलचा जाण्या-येण्याचा पूर्ण राईट टाईम व रूट ची माहिती घेतली असून इतरांनी मदत करावी असे सांगून आरोपी रवी उर्फ ते जरा भगवान शिरसाठ यांनी मेघा रेतून गाडी निघाल्यावर गाडीचे लोकेशन द्यावे व इतर आरोपींनी समृद्धी महामार्गावरील देऊळगाव कोळपुलावर जाऊन तिथून दगडफेक करून गाडी फोडावी असे ठरविले होते. त्या प्रमाणे दिनांक ७ ऑक्टोबर 2024 रोजी नऊ वाजता च्या सुमारास रामनारायण चव्हाण यांनी रवी शिरसाठ यास मेहकर येथे जाऊन गाडीची माहिती देण्यास सांगितले व तो आरोपी शुभम आठोळे यांच्या मोटरसायकलने त्याचे वाटेल वरून बीबीए त्याला बीबीएथून आरोपीत जावस हे घ्या सोबत घेऊन मोटरसायकलने कुंभेफळ गावाकडून जळगाव कोळे येथील ब्रिजवर जाऊन थांबले दरम्यान आरोपी रामनारायण चव्हाण व जावेद शेख यांनी आरोपी रवी शिरसाठ यास
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेळोवेळी संपर्क करून माळी ट्रॅव्हलची माहिती घेतली त्यांना रवी शिरसाठ कडून ट्रॅव्हल्स मेहेकारीतून समृद्धी महामार्गाने जालना दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळताच त्यांनी पुलाच्या बाजूला पडून असलेले दगड गोळा करून फुलाच्या कठोर ठेवले समृद्धी महामार्गाने माही ट्रॅव्हल्स मुलाजवळ पोहोचले असतास ट्रॅव्हलचालका जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुलावरून ट्रॅव्हलवर दगडफेक फेकून मारले व अनाचा काच फुटून देखील गाडीने थांबतात निघून गेल्याने आरोपींनी घटनास्थळावर मोटर सायकलने पळ काढला व त्यांच्या रामभरोसे हॉटेलवर येऊन थांबले अशा प्रकारचा घटनाक्रमाची आरोपींनी कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपींनी दिलेल्या कबुली वरून तिच्या जबाबदावरून नमूद आरोपी रामनारायण दिगंबर चव्हाण यांनी पूर्व वैमन्याशातून व व्यवसाय झालेल्या आर्थिक नुकसानातून तसेच ट्रॅव्हल मालकाने 2023 मध्ये पोलीस स्टेशन डिग्रज येथे दिलेल्या तक्रारीच्या रागातून त्यांचे इतर आरोपी साथीदाराच्या मदतीने कट रचुन माही ट्रॅव्हल्स चालकास जीवे ठार मारण्याच्या तसेच वाहनाचे नुकसान करण्याचे उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगड फेकून मारल्याने निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात कलम 109 (1) एक कलम 61(1) भारतीय न्यायसंहिता हे कलम वाढ करण्यात आले.
policenews:गुन्ह्यात उपरोक्त नमुद चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून गुन्ह्याची उकल करण्याची सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे ,माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी. महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर श्री प्रदीप पाटील ,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बीबी चे ठाणेदार सपोनी संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन वास्टेवाड, पोलीस अंमलदार अरुण मोहिते ,अरुण सानप, रवींद्र बोरे, यशवंत जैवळ ,सायबर सेलचे ऋषिकेश खंडेराव यांनी केली