कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी
लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर
Policenews:भुमराळा येथील आरोग्य सेवक नारायण गोविंदराव सानप वय 54 वर्ष यांच्या घरी दि 13 सप्टेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडुन अंदाजे 115000/रू ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहे.
सदर प्रकरणाची माहीती देवानंद सानप यांनी शंभर नंबर वर फोन कळविले असता सदर ठिकाणावर बिबी पोलीस तात्काळ हजर होउन सदर प्रकरणाची शहानिशा करून तात्काळ श्वानपथक व ठसेतज्ञ बोलावून नमुने घेण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथे दि 13 सप्टेंबर रोजीच्या रात्री 9.30 दरम्यान नारायन गोविंदराव सानप हे परीवारा सह जेवन करून झोपले असता रात्री 1.30 वाजेच्या दरम्यान सानप यांना घरात मागील दरवाजा कापल्या जात असल्याचा आवाज आला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे त्यांना जाग आली व ते जागी होऊन समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर घराचे सर्व दरवाजे बाहेरुन लावलेले होते.अशा वेळी सानप यांनी मोबाईल पाहीला असता तो दिसला नाही म्हणून घरातुनच आरडा ओरड करुन शेजारील लोकांना आवाज दिले आवाज ऐकताच शेजारी जागी झाले व त्यानी दरवाजे उघडुन सानप व त्याच्या परीवाराला बाहेर आनले तोवर चोरटे हात साप करून पसार झाले होते.
सदर चोरट्यांनी घराच्या चॅनल गेट चे कुलुप तोडुन जिण्या खालचा दरवाज्याला होल पाडुन कडी उघडुन घरात प्रवेश केला होता सानप यांनी घरातील वस्तुची पाहणी केली अस्ता बेडरुम मधील लोखंडी कपाटातुन 5.ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे 25000/रु ,5.ग्रॅम सोण्याचे झुंबर अंदाजे 25000/रु,4.ग्रॅम सोण्याचे गहु मनी 37 नग अंदाजे 20000/रू,लटकवेलेली पॅनट मधील नगदी रोख 10000/रु,बचत गटाचे ठेवलेले 5000/रु,कपाटातले नगदी पाच -पाचशे च्या 60 नोटा 30000/रु ,मोटार साईकल, कार ची चाबी व मुळ कागद पत्रे असे एकुन अंदाजे 115000/रु औवज अज्ञात चोरट्यांनी पसार केला अशी फिर्याद नारायण सानप यांनी बीबी पोलीस स्टेशनला दिली असतांना पोलीसांनी अप नं 13/2024 कलम 331(4),305 भारतीय न्याय संहीता 2023 नुसार गुन्हा दाखल करून घटनेचा पंचनामा केला असून पूढील तपास ठाणेदार संदिप पाटील, सफो परमेश्वर शिंदे , पोहेकों अशोक अंभोरे, मापोको नितीन मापारी, नापोका अरुण सानप पोका यशवंत जैवळ पोकों रविंद्र बोरे पोका भारत ढाकणे हे करीत आहे.
Policenews :भुमराळा हे गाव डोगराच्या कुशीत बसलेले असून गावाच्या आजू बाजूला वनविभागाचे जंगल असून हे गाव मराठवाड्याच्या सिमेलगत असल्याने या गावात दरवर्षी अशाच प्रकारची घरफोडी चोरटे करतात भुमराळा आणी चोरी हे समीकरण च झाले आहे हे विशेष आता पोलीस या चोरीच्या प्रकरणाकडे कसे गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे