पोलीस स्टेशन बीबी यांच्याकडून शाळेत जनजागृती अभियान ( policenews )

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

policenews:सध्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी शालेय बालकांवर (मुले मुली)यांच्यावर अत्याचाराच्या काही घटना झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या जागृती करणे, विद्यार्थ्यांवर अत्याचार होऊ नये याकरिता उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बीबी पोलीस प्रयत्न करत आहेत.

व शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आहेत. याच अभियानात बीबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप पाटील व पोलीस अंमलदार यांनी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी येथे जाऊन तेथील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांना 1) गुड टच व बॅड टच संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

पोक्सो कायदा बाबत माहिती देण्यात आली. 2) शाळेतील प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर स्टाफ, वाहन चालक यांना विद्यार्थ्यांची घ्यावयाची खबरदारी याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधून सिंदी रेल्वे शहरात कायमस्वरूपी तहसिलदार देण्याची मागणी मान्य झाल्याने घेतलें आंदोलन मागे..(  tahsilnews )

3)बदलापूर मुंबई सारखी घटना घडू नये याबाबत मार्गदर्शन केले.
4) शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गोपनीय तक्रार करता यावी याकरिता शाळेत तक्रार पेटी ठेवण्याबाबत, 5)पोलीस मदतीकरिता 112 नंबर वर संपर्क करण्याबाबत 6)मुला, मुलींकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र व बंदिस्त वॉशरूम ची व्यवस्था 7)पो स्टे परिसरात cctv बसवणे.

8) शाळेत शाळेच्या विद्यार्थी व्यतिरिक्त इतर व्यक्ती आल्यास त्याची चौकशी करावी.संशयित वाटल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती 9) पालक किव्वा नातेवाईक म्हणूनही अनोळखी व्यक्ती भेटीकरिता कोणी आल्यास आपल्या शाळेच्या रेकॉर्डवरून, विद्यार्थी कडून किव्वा त्याचे आई-वडिलांकडून संबंधित व्यक्तीची खात्री करावी. 10)तसेच त्यांचे शाळेतील बाहेर गावाचे विद्यार्थ्यांना ने आण करणारे चालक तसेच गाड्यांमधील इतर कर्मचारी तसेच शाळेतील सफाई कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी अहवाल बनवून घेण्या बाबत सूचना दिल्या.

11) बालक (मुलगा/मुलगी) सोबत एखादी चुकीची घटना घडल्यास किव्वा एखादा व्यक्ती वारंवार आपल्याशी नको असलेली जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्यास किव्वा अन्य मार्गाने आपल्याला त्रास देत असल्यास बालकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला त्वरित कळवावे, शाळेत शिक्षक यांना सांगितल्यास किव्वा निदर्शनास आल्यास त्यावर त्वरित कार्यवाही करावी. त्याची माहिती पोलीसांना द्यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा प्रकारचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, व इतर स्टाफ यांना करण्यात आले. तसेच सहकार विद्यालय बीबी येथे देखील महिला अंमलदार दीपमाला पुरंदरे यांनी मुलींना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले. व ठाणेदार यांनी स्कुल बस चे चालक यांना सूचना दिल्या.

policenews:सदरची मोहीम पो स्टे हद्दीतील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार असून पोलीस स्टेशनकडून शाळा भेट रजिस्टर ठेवून बिट अंमलदार,अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

Leave a Comment