लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर
policenews:लोणार तालुक्यातील उदनापूर गाव हे एक हजार लोकसंख्येचे असून गावातील सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडावे, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही म्हणून शांतता समितीचे बैठकीसाठी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिश मेहेत्रे यांनी गावाला भेट दिली.
यावेळी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद व्हावी अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. त्यावेळेस तुमच्या गावात दारू 100% बंद होईल अशी ग्वाही, ठाणेदार मेहत्रे साहेब यांनी दिली.
त्याच बरोबर नवीन कायद्यात बदल झाल्याची अतिशय महत्त्वाची कायदेविषयक माहिती यावेळेस त्यांनी नागरिकांना समजावून सांगितली . गावातील सुशिक्षित तरुण युवक मंडळींनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावे, व्यसनापासून दूर राहावे अभ्यासात सातत्य ,शारीरिक मेहनत केल्यास तुम्हाला तुमचे यश खेचून आणण्यात अवघड जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
भरतीसाठी योग्य मार्गदर्शन पोलीस स्टेशनच्या कडून देण्यात येईल असेही ते म्हणाले अवैध दारू विक्रेत्याची तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्याची गया केली जाणार नाही ,अशे ठणकावून सांगितले.
policenews:आगामी काळातील सण, उत्सव आनंदात व सलोख्याने शांततेत साजरे करावे असे आवाहनही त्यांनी या वेळेस केले. गावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात भेट देवून प्रसादाचा लाभ घेतला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांची उदनापूर गावाला भेट अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही ठाणेदारांनी यावेळी ठणकावले ( policenews )
policenews:यावेळेस उपस्थित सरपंचपती विजय मुळे, पोलीस पाटील राजू मुळे, मा. सरपंच विलासराव मुळे, शाळा समिती अध्यक्ष श्रीराम मुळे, मा. ग्रा. सदस्य अरुण मुळे यांच्यासह अनेक महिला वर्ग व गावकरी मंडळी, तसेच ठाणेदारासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.