उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने अटाळी उमरा रस्त्यावर इसमाच्या ताब्यातून 94 हजार 340 रुपयाचा देशी-विदेशी दारू व इतर साहित्य केले जप्त..आरोपीला अटक (police)

0
4

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

police:खामगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अटाळी उमरा रस्त्यावर संशयास्पदरीत्या जाणाऱ्या इसमाच्या ताब्यातून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने 94340 रुपयाचा देशी विदेशी दारू शिशा व इतर साहित्य मुद्देमाल जप्त केले.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला खात्रीशीर व गुप्त माहिती मिळाली की अटाळी उमरा रस्त्यावर देशी विदेशी दारू विनापरवाना एक इसम घेऊन जात आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अटाळी उमरा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत दिसणाऱ्या आरोपीची जळती घेतली असता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आरोपीच्या ताब्यातुन देशी दारुच्या 90 मिलीच्या 2560 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. 88,600/- रुपये, 2) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या कंपनी सिलबंद
काचेच्या 35 नग शिशा कि. 5,600/- रुपये, 3) 06 नग हिरव्या रंगाच्या कापडी थैल्या कि. 120/- रुपये, 4) 04 नग पांढ-या रंगाच्या पोतड्या कि. 20/- रुपये असा एकुण कि. 94,340/- रुपये चा प्रोव्ही मुददेमाल मिळुन आला.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे साहेब खामगांव यांचे आदेशाने Psi. मनोज वासाडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, योगेश कुंवारे, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.हे.कॉ. सिमा खिल्लारे, चालक पो.ना. पवन मोरे यांनी केली.

police:याप्रकरणी खामगाव ग्रामीणमध्ये पो.हे.कॉ. सुधाकर प्रभाकर थोरात बनं 1413 उप.वि.पो.अ.कार्यालय, खामगांव जि.बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद इफ्रेश जहीरोद्दीन देशमुख वय 32 वर्षे रा. अटाळी ता. खामगांव विरुद्ध कायमी अप क्र. 363/2024 कलम 65 ई मदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here