Pikvima / हिंगणघाट तालुक्यात मनसेच्या दणक्याने पीक विमाचे पैसे वाटपाला सुरुवात

0
231

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील पिक विमा कंपनीने गेल्या बरेच दिवसापासून वर्धा जिल्ह्याला पिक विम्याच्या पैशासाठी फार मोठी रुकावट दिली होती विदर्भाच्या बरेचसे जिल्ह्यात पैशाचा वाटप सुरू करून सुद्धा वर्धा जिल्ह्यात वाटप केलेला नव्हता.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हिंगणघाट पिक विमा कंपनीला सात दिवसाचा अल्टिमेट देऊन निवेदन देण्यात आले होते पिक विमा कंपनीने मनसेकडून देण्यात आलेल्या अल्टिमेट मुळे पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.

SanjayRaut / छत्रपती शिवाजीचा अवमान; राजकीय वाद वाढला” :- संजय राऊत 

तरी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सर्वतोपरी पसरलेला आहे व जनतेत मनसेमुळे वाटप सुरुवात झालेला आहे अशी चर्चा सर्वत्र पसरलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयंता कातरकर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जिल्हा अधक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना वर्धा जिल्हा यांच्या

Pikvima :प्रमुख नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष राजू बोंबले तालुकाध्यक्ष पवन समुद्रपूर तालुका अध्यक्ष विठ्ठल तळवेकर तालुका संघटक हरिभाऊ महाजन हिंगणघाट शहराध्यक्ष केतन तायवाडे व तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले तालुका संघटक देवा काटकर सर्कल अध्यक्ष सागर घवघवे रमेश बावणे अनिकेत वानखेडे समुद्रपूर तालुका सचिव संजय हिंगणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Pikvima :पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते त्यानिमित्त जयंत कातरकर यांनी शेतकऱ्यांना पैशाचा वाटप केल्याबद्दल त्यांच्या खात्यात पैसा जमा होत असल्यामुळे पिक विमा कंपनी प्रबंधक यांचे आभार व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here