पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची दिशाभूल शेतकऱ्याला मिळाला फक्त १०% टक्के पिक विमा ( pikvima )

 

Pikvima :संपूर्ण सिंदखेड राजा , देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप पिक विमा कपाशीचा अवघ्या फक्त १० ते २० टक्क्यांनी मिळत आहे खरीप जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळाला नाही जो काही मिळाला तोही शेतकऱ्यांच्या तोंडाला पान फुटल्यासारखा आणि शेतकऱ्याला व्यतीत आणणारे आहे.

26/ 11/2023 रोजी सिंदखेड राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अति नुकसान गारपीट झाली होती त्या गारपिटीची पाहणी करण्यासाठी बुलढाणा लोकसभेचे विद्यमान खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब पालकमंत्री ,श्री दिलीप वळसे पाटील साहेब हे सर्व सत्तेतले आणि विरोधक सर्व नेते मंडळी पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

आणि शेडनेट बीज उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि येथील संपूर्ण शेतकऱ्यांची १००% टक्के नुकसान झाली असे सर्वांनी जाहीर केले आणि त्या ठिकाणी ,जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, आणि पिक विमा जिल्हा प्रतिनिधी, हे सुद्धा उपस्थित होते अद्याप पीक विमा कंपनीने फक्त १० % ते २०% पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा देत आहे.

म्हणजे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान होऊन तर मदत मिळत नसेल तर पिक विमा कंपनी ही कोणासाठी जिल्ह्यात काम करत आहे या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला. याच प्रश्नसंदर्भामध्ये शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर साहेब व शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा व बळीवंश या संघटनेमार्फत श्री बालाजी सोसे, गजानन जायभाये यांनी अन्नत्याग आमरण उपोषण करून सुद्धा शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही.

आणि म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे शेतकरी योद्धा कृषी समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले पिक विमा ही कंपनी फक्त जिल्ह्यातील सत्ताधारी नेते मंडळींचा पोट भरण्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांचे आणि खासदारांचे पोट भरण्यासाठी आहे का मंग सर्व मंडळी का हा प्रश्न उपस्थित करत नाही.

आणि सरकारकडे का लावून धरत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही पीक विमा कंपनी काम करत नाही ज्या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत जाहीर करून दिली ती मदत जवळपास सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यांमध्ये 50% पासून तर 98% पर्यंत ती नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाला आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने मदत दिली मग पिक विमा कंपनी १० ते २० % टक्क्यांनी मदत का देती हा प्रश्न संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नेते मंडळींनी उपस्थित करायला पाहिजेत होता.

पण सर्व नेते मंडळी गप्प बसले आहे राज्य सरकारने ठरवल्यानंतर पिक विमा कंपनीला टक्केवारी ठरवण्याचा अधिकार नसावा आणि राज्य सरकारच्या नुकसान झाल्याचे टक्केवारीनुसारच पिक विमा मिळाला पाहिजेत होता, म्हणून आता शेतकऱ्यांनी जर निर्णय घेतला तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये जड जाईल कारण तुम्हाला शेतकऱ्याच्या पिक विम्याच्या प्रश्ना बद्दल जर बोलायचं नसेल तर सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या दारामध्ये मतदान माघाला यायचं नाही नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांच्या दारामध्ये रूमनं घेऊन उभा राहील मग तुम्हाला पळती भुई कमी होईल.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणून सर्व राजकीय पक्षांना मी विनंती करतो शेतकऱ्याच्या पिक विमा बद्दल सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवा नक्कीच पीक कंपनीला जाग येईल आणि तसेच शेतकरी मित्र श्री दिलीप चौधरी व शेतकरी योद्धा कृती समिती समन्वयक श्री बालाजी सोसे यांच्या नेतृत्वाखाली ३० तारखेच्या आत दिलेल्या निवेदनामधील आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या पुकारलेलं आत्मदहन हे आंदोलन होणारच

Pikvima :शेतकऱ्याला न्याय मिळेल नाहीतर तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो शूट करण्यासाठी तुम्ही सर्व तुमचे दौरे असतात हे सर्व सामान्य शेतकऱ्याच्या लक्षात येईल असं मत शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी व्यक्त केलं

Leave a Comment