इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव. शिवारातील अतिवृष्टीचे अनुदानाची रक्कम, पिक विम्याची रक्कम पीएम किसान योजनेचे रक्कम आज पर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रलंबित निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी.
पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे मा. नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा जिल्हा भाजपा सरचिटणीस तथा समस्त शेतकरी बांधवांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमुद आहे की माहे जून २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शेगाव व शेगाव शिवारात झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे.
सदर नुकसानी संदर्भात तलाठी कार्यालय, कृषी अधीक्षक कार्यालय यांचे मार्फत सर्वे होऊन काही शेतकऱ्यांना VK नंबर सुद्धा मिळालेले आहेत तथा त्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे आणि काही शेतक-यांना बँकेचा पैसे खात्यात जमा झाले चा मेसेज सुद्धा आलेला आहे.
परंतु त्या शेतकरी बांधवांना त्यांचे बँक खात्यात एकही रक्कम जमा झालेली नाही. तसेच काही शेतकऱ्यांना व VKनंबर सुद्धा मिळालेला नाही तसेच पिक विम्याची रक्कम सुद्धा शेगाव शिवारात मिळालेली नाही, व काही शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे आधारसीडींग तथा केवायसी करून सुद्धा त्यांना रक्कम आज पावेतो मिळालेली नाही.
शेतकरी संबंधित अधिकार्याची वारंवार आपल्या तक्रारीच्या संदर्भात पाठपुरावा करत असून त्यांना आजपर्यंत अधिकार्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही किंवा त्या संदर्भात त्यांचे बँक खात्यात कोणतीही रक्कम जमा झालेली नाही.
तरी आम्हा सर्व शेतक-यां तर्फे विनंती आहे को संबंधित अधिकर्याना आपण आदेश देऊन सदर शेतक-यांच्या
तक्रारी संदर्भात अतिवृष्टीच्या अनुदानाच्या रकमेच्या साठी वेगवेगळे कॅम्प तथा पीएम किसान योजनेच्या त्रुटीसाठी वेगळा कॅम्प लावावा व विमा कंपन्यांच्या संदर्भात संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे ही अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर पुरुषोत्तम चंद्रमान हाडोळे माजी नगरसेवक तथा जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस शेगाव,अरविंद इंगळे किसान सरचिटणीस तथा किसान आघाडी तसेच.
Pikvima : राजेंन्द्र महादेव शेगोकार,केशव पुंडलिक वाढोकार,रामेश्वर इरभान शेगोकार,श्रीकृष्ण इरभान हाडोळे,राजेश शालिग्राम सुरवाळे प्रशांत पुष्पाकर काठोळे,गजानन लक्ष्मण पल्हाड़े गोपाल हरभान शेगोकार,अविनाश मुरलिधर काठोळे,रमेश त्रंबक कलोरे,संजय काशीराम काठोळे,मोहन विक्रम पल्हाडे,शशीकला इरभान शेगोकार,महेन्द्र मोहन शेगोकार,अजाबराव आत्माराव शेगोकार,कस्तुराबाई श्रीपद शेगोकार, कमलाकर चव्हाण यांच्या सह्या आहेत.