परभणी येथे दलित वस्तीतील चालविलेलेकोबींक ऑपरेशन थांबविण्यात यावे याकरिता समतेचे निळे वादळ ह्या सामाजिक संघटनेचे बुलढाणा जिल्हा अधिकारि मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनसादर.(parbhaninews)

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनीधी

parbhaninews:मलकापूर, समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हा अधीकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शिलालेखाची समाज कंटकांने नासधूस केल्याने प्रचंड जनक्षोभ निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर उद्देशिकेची विटंबना करणाऱ्यास अटक केली असली तरी दलित वस्तीमध्ये पोलिसांचे कोबी ऑपरेशन सुरू आहे. अनेक निरपराध लोकांना अटक करणे सुरू आहे. तरी या निवेदनाद्वारे मागणी आहे की-
१)विटंबना करणाऱ्याची नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीशी असलेल्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यात यावा व त्यांना अटक करावी

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

२) सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे*
३) दलित वस्त्यांमध्ये चालविलेले कोबिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे
४) असा प्रकार करणार नाही म्हणून उदाहरणार्थ शिक्षा करण्यात यावी.

सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱीमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

parbhaninews:याप्रसंगी “समतेचे निळे वादळ” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भाईअशांत वानखेडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, प्रकाश पचेरवाल, जिल्हाध्यक्ष, अशोक दाभाडे. यांच्यासह दिलीप इंगळे, शेख इमरान,माजीद खान, दीपक मेश्राम, रविभाऊ भारसाकळे, विजय सोनवणे, राजेश रायपुरे, भूपेंद्र जाधव, श्याम पवार, श्रीकांत राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment