प्रतिनिधी सचिन वाघे
Obc:हिंगणघाट :- संत तुकडोजी बॅक हिॅगणघाट ईथे राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ यांचा महीला मेळावा तसेच नविन पदाधिकारी यांच्या नियुक्तीपत्र देण्यात आले.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय ओ बि सी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे सर, तसेच महीला राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुषमा भड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती ढोकणे, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा अर्चना भोमले, या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनात तसेच रागिणी शेंडे वर्धा जिल्हा अध्यक्षा यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात अर्चना भोमले ओबीसी समाजा बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले महिलांचे हक्क अधिकार काय आहे हे समजावून सांगितले. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवुन त्याच्या वर जबाबदारी सोपविण्यात आली.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वर्धा जिल्हा उपाध्यक्ष पदी वंदना हिवंज, मंगला देशमुख , हिॅगणघाट तालुकाध्यक्ष लता सुकळकर, कार्याध्यक्षा सुनिता तळवेकर ,तालुका उपाध्यक्षा सुवर्णा भोयर, हिॅगणघाट शहर अध्यक्षा मेघना वानकर , कार्याध्यक्षा पद्दी सुनिता गुजरकर ,तसेच समुद्रपूर तालुका अध्यक्षा स्वाती हिवंज , समुद्रपूर शहर अध्यक्षा दिपा निगोट यांची नियुक्ती करण्यात आली .ह्या सर्व पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्र देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
Obc:तसेच ह्या कार्यक्रमाला काॅग्रेस विजे एनटी जिल्हाध्यक्ष सोनाली कोपुलवार , मंदाकीनी ढाले,चंदा येलेकर, सुजाता जिवणकर, सौ. कल्पना हिवंज, विध्या गिरी, शितल शेंडे, माधुरी मालेकर, सुनिता भोयर , बेबी कोल्हे ,शकुंतला बावणे, प्रतिभा सोनटक्के ,सोनुलकर ,बुराडे अश्या बहुसंख्य ओबीसी महीला भगिनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.