Home Blog Page 596

अखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश

0

अखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश

 

 

 

 

जळगाव जामोदः संजय रामदास भोंगाळे रा . आसलगाव यांची पत्नी के शारदा संजय भोंगाळे हिची डिलेवरी करीत असतांना बाळाची अमानवीयरित्या डिलेव्हरी केल्याकारणाने बाळ मृत पावले . त्यामुळे संजय भोंगाळे यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे डॉ . अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल जळगाव जामोद यांचे विरुध्द लेखी तक्रार दिली परंतु पो.स्टे.जळगाव जामोद यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संजय भोंगाळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर यांचेकडे रितसर लेखी तक्रार केली त्यांनी सुध्दा त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे संजय भोंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडे तक्रार दिली परंतु त्यांनी सुध्दा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे संजय भोंगाळे यांनी
सामाजिक कार्यकर्ता ऊषा ताई मानकर यांचे सहकार्य ने विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट जळगाव जा . येथे डाॕ.अविनाश पाटील यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याकरीता फिर्याद दाखल केली होती . वरील कोर्ट ने डॉ. अविनाश पाटील (समाधान हॉस्पटल) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला असुन त्यानुसार डॉ . अविनाश पाटील यांचे विरूद भा.दं.वि.चे कलम ३०४ , ३१६ , ३१८ , ३३६ , ३३८ , २ ९ ४ , ५०४ ३५०६ नुसार पो.स्टे.जळगाव जामोद यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत . संजय भोंगाळे यांचे वतीने कोर्टात अॕड.रूपेश विश्वेकर अॅड . प्रविण मनसुटे , अॅड . अभिमन्यु वाघ ( पाटील ) यांनी काम पाहिले

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात

0

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन
भर पावसात आंदोलन ची सुरवात

 

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हान

आज पूर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना कोविड 19 च्या महामारी मूळे 22 मार्च पासून देशातील संपूर्ण देवस्थांने बंद होते धिरे धिरे काही राज्यातील मंदिरे सुरू झाली तसेच महाराष्ट्र मध्ये अनलॉक 3 सुरू असताना धिरे धिरे सर्वच सुरू केले मात्र मंदिर हे अजूनही बंदच आहेत त्या मुळे भक्त महाराष्ट्र सरकार वर नाराज असून आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप व विहिप व बजरंग दल यांच्या कडून मंदिर उघडा म्हणून घंटा नांद आंदोलन चे आयोजन करण्यात आले होते त्याला पाठिंबा म्हणून हिंदुत्ववादी संघटना पण या मध्ये सामील झाली होती आज संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर, वरवट बकाल व पातुर्डॉ बु येथे बजरंग दल व भाजप कडून आठवडी बाजारातील राधाकृष्ण संस्थांन च्या मंदिर समोर सतत सुरू असलेल्या पावसात पण घंटा नांद आंदोलन केले व महाराष्ट्र सरकार चा निषेध करत अजब उद्धवा मंदिराचे दार उघड दार उघड असे नारे देऊन सरकार ला मंदिर उघडण्यासाठी चेतावणी दिली या वेळी प स सदस्य सौ रत्नप्रभा ताई धर्माळ, ग्रा प सदस्या सौ गोकुळा ताई बोपले,भाजयुवा जिल्हा सरचिटणीस लोकेश राठी, बजरंग दल तालुका सहसयोंजक अविनाश बोपले,दुष्काळ निवारण समिती ता अध्यक्ष रामदास म्हसाळ, ग्रा प सदस्य विनायक चोपडे,कपिल गवई, माजी उपसरपंच भास्कर आढाव,जेष्ठ नेते रामेश्वर इंगळे,बाळू भाऊ वानखडे,भगवान राठी,रमण सेवक,विजय आढाव,न्यानेश्वर निमकर्डे, बाळू भाऊ इंगळे,जेष्ठ नेते किसनराव राहाटे, शहर अध्यक्ष श्रीकृष्ण मोहनकार, न्यानेश्वर तायडे,सुभाष बोपले,प्रमोद तायडे,वैभव राहाटे,रामदास धर्माळ,शंकर बोपले,उकर्डा कुरवाडे, नंदू भाऊ राहाटे,प्रमोद देऊळकार, कैलास गवई,विजय मांडवगडे,अविनाश धर्माळ यांची उपस्थिती होती

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…

0

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…

 

 

सि :राजा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदाराणा निवेदन देण्यात आले आहे की तालुक्यात राष्ट्रीय कृत बँकेकडून नागरिकांचे हाल होत आहेत त्यासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेत वृद्धान साठी वयक्तिक काऊंटर उपलब्ध करून द्यावे तसेच आधार लिंक, kyc फार्म नेटबँकिंग व नवीन खाते या बाबींसाठी स्वातंत्र् व्यवस्था करून दयावी जेणेकरून वृद्ध व्यक्तींना त्रास होणार नाही आणि ATM सेवा 24 तास सुरु ठेवावी व कोरोना परिस्तिथी लक्षात घेता सोशल डीस्टटासिंग चे काटेकोर पणे पालन करावे. या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात ग्रामशाखा दरेंगाव शाखाध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील;शाखाउपाध्यक्ष बालाजी चाटे, तालुकाध्यक्ष निलेशदेवरे; पवनराजे जाधव,भागवतराजे जाधव,शिवादादा पुरंदरे या महाराष्ट्रसैनिकांच्या सह्या आहेत…

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

0

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी जळगाव जा

 

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शाळा बंद असलेल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास पाठवणे चालू आहे परंतु ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांजावळ अँड्रॉइड मोबाईल नाही व काही विद्यार्थ्यांना मोबाईलवरनं अभ्यास करणे कठीण व शक्य नाही हे विचारात घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका अस्मिता क्षीरसागर यांनी सूनगाव येथील जी प शाळेतील वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास कसा करावा व अभ्यास तपासून पुढील स्वाध्याय दिला या प्रमाणे शाळा बंद पण शिक्षण सुरूच ही म्हण पूर्णत्वास नेली व एक आदर्श उपक्रम राबविला

गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण

0

गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

गजानन सोनटक्के जळगाव जा

 

जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहुपट्टा आदिवासी गावाजवळ असलेल्या गोराडा धरण 45 ते पन्नास वर्षे जुने आहे या धरणाला सातपुड्यातून वाहत असलेल्या भिंगार नादिद्वारे धरणाला पाणी मिळते या धरणातून जळगाव जा ला पाणीपुरवठा केल्या जात होता या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात 15 ते 20 दिवसापासून रिमझिम पाऊस चालू असल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली व धरण 100 टक्के भरले आहे या धरणाचे पाणी शेतीसाठी शेतकऱ्यांना दिले जाते त्यामुळे या भागातील शेती ही ओलिताखाली आली आहे या धरणाचा साठा वाढल्याने परिसरातील विहिरी बोअरवेल च्या पातळीत वाढ वाढ होत आहे हे धरण सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने निसर्गरम्य वातावरणात धरनाचा परिसर आहे त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील लोक हे धरण पाहण्यास येत असतात व वातावरणातील आनंद घेत असतात