यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील किनगाव गावातुन घरासमोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी वय४२ वर्ष राहणार किनगाव खुर्द हे दिनांक २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपुर येथे गेले होते ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवुन गेल्याची बाब दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावर समजले , अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सिके ४७६५हे दुचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली असुन , यावल पोलीस स्टेशनमध्ये सत्तार बिस्मिल्ला पिंजारी यांनी दिलेल्या माहीतीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवी कलम३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे