new year :नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी केली होती गर्दी..

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

new year : कॅलेंडर प्रमाणे 1 जानेवारी 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत व्हावे.

या उद्देशाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे कोकण या भागासह राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेगाव शहरात गर्दी करणे सुरू केले होते भाविकांची वाढतील गर्दी लक्षात घेता श्रींच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराज मंदिर 31 डिसेंबरच्या रात्री रात्रभर सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दर्शन बारी मध्ये मंदिर परिसरात गर्दी करीत होते.

गरिबीची जान आणि श्रीमंतीची आन घेऊन सर्वसामान्य ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे भंवरलाल जैन:bhavarlaljain 

new year आज नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारीला श्रद्धापूर्वक लाखो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे श्री राम मंदिरातील राम लक्ष्मण सीतामाता व हनुमान त्याच्या मूर्तीचे तसेच श्रींच्या गृहातील गादीचे दर्शन घेतले व नवीन वर्ष सर्व भारतीयांना सुख समृद्धीचे जावो अशी श्री चरणी प्रार्थना केली.

Leave a Comment