MurderNews:उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुरम डी ब्लॉक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याची त्यांच्या सून आणि तिच्या चुलत बहिणीने निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण पohlिसांसमोर आलं आहे.
ही घटना नुकतीच शुक्रवारी रात्री घडली, जेव्हा निवृत्त कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेतील रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर सापडला.
पाती सिंग (६८) हे त्यांच्या घरी एकटे राहत होते. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झालं, तर त्यांचा मुलगा जितेंद्र कोरोना काळात वारला.
जितेंद्राची पत्नी आरती ही घराच्या वरच्या मजल्यावर राहते. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही, मात्र आरती आणि तिच्या चुलत बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी दखल घेतली आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या तपासानुसार, हत्येच्या दिवशी रात्री पाती सिंग यांच्याशी आरती आणि तिच्या चुलत बहिणीचं भांडण झालं, ज्यात ती क्रिकेट बॅटने मारहाण केली होती. पोलिसांना प्रॉपर्टीवरून झालेलं भांडण मारण्याचा संशय आहे.
MurderNews::शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी पाती सिंग एका महिलेसोबत राहत होते. त्याची माहिती मिळताच आरती त्यांच्या दोन्ही मुलांसह १५ मार्च पासून दुसऱ्या मजल्यावर राहू लागली. त्यानंतरच त्यांच्या चुलत बहीण तिथं येऊन राहू लागल्या. पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू आहे.