नागपूरच्या इमामवाडा परिसरात 26 मार्चला एक धक्कादायक घटना घडली,
Murdernews:ज्यामध्ये एका पित्याला त्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या विरोधात धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृताचे नाव नरेश वालदे असून ते 53 वर्षांचे रंगकामाचा व्यवसाय करणारे होते. ही घटना त्यांच्या मुलीला सतत त्रास देणाऱ्या तरुणांविरुद्ध ते विरोध करत असताना घडली.
नरेश वालदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्याद दिल्यानुसार काही तरुण बराच काळापासून त्यांच्या मुलीला सतत त्रास देत होते. या विरोधात नरेश वालदे यांनी टोकाची भूमिका घेतली आणि त्यांचा आरोपींशी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नरेश यांचा जीव धोक्यात आणला.
बुधवारी, 26 मार्च रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्यांना जट्टारोडी परिसरात भेटायला बोलावले. तिथे जेव्हा ते गेले, तेव्हा आरोपींनी त्यांची हत्या केली.
नरेश वालदे हे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत नागपूरच्या इमामवाडा परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती, पण पोलिसांनी तेव्हा याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
Murdernews :या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून घटनेची तपास सुरू आहे. आरोपींची नावे निलेश उर्फ नाना मेश्राम आणि इश्वर उर्फ जॅकी सोमकुवार अशी आहेत.