आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचारी पुरवठा बाबत तक्रारींची दखल कोणी घेणार ???
mukund joshi:नागपूर/ प्रतिनिधी दि १८/९/२०२४:- नागपूर विभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळा , वसतिगृहे आणि जिल्ह्यातील अहेरी , भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आणि शासनाची आर्थिक फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
या प्रकरणी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कोणती कारवाई करण्यात यशस्वी होतात. याकडे विविध संघटनांचे लक्ष वेधले आहे. याबाबत महामहीम राज्यपाल , जिल्हाधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे संतोष तलांडी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती.
मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरत आहे याचा थांगपत्ता लागत नाही.
गडचिरोली येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुजोर आचारी मुकुंद जोशी यांनी एका स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून बऱ्याच शासकीय रुग्णालयात भोजन पुरवठा केला आहे.
त्यात शासनाच्या तिजोरीला चुना लावला असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आणि मिलिभगत करुन अवाढव्य बिले वाढवून
अवैधरित्या लाखो रुपये हडप केले असल्याची चर्चा सुरू आहे.
मुकुंद जोशी हे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालयात आहार , मनुष्यबळ, सुरक्षा रक्षक , धोबी , कक्ष सेवक , सफाई कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार होते. सर्व कंत्राट आपणालाच मिळावे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे कामही जोशी यांनी केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन वेळेत असलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेतल्यास दिवसभर कार्यालयात बसून राहाणारा लाचार आचारी फुकट शासकीय खुर्चीवर बसून राहत होता. याची गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाला प्रचिती येईल यात शंका नाही. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची नितांत गरज आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुकुंद जोशी हे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि ईतर ठिकाणीही काम मिळेल अशी आशा बाळगुन ई .. निविदा सादर करित होते. परंतु सादर केलेल्या दरापेक्षा कमी असलेल्या ठेकेदाराला कंत्राट मिळाले तरी मुकुंद जोशी पिसाळून जाऊन माहिती अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्यासाठी माहिती मागण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.
mukund joshi:त्यामुळे संबंधित शासकीय विभागात कार्यालयीन कामकाज करतांना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मुकुंद जोशी हा खंडणी बहादुर असुन पिसाळलेला असल्याचीही चर्चा गडचिरोली शहरात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी मुकुंद जोशी हे खंडणीबाज आणि ब्लॅकमेलर असल्याचे मत व्यक्त करुन त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. मुकुंद जोशी यांच्या मनमानी , मुजोरी आणि वारंवार होणाऱ्या पत्रव्यवहारामुळे शासनाच्या, प्रशासनाच्या अनेक आस्थापनेवरील कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेळ आणि पैशाचा अपव्यय होऊन नियमित काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांवर मानसिक तणावामुळे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुकुंद जोशी यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींचा लेखाजोगा जमा करून अटक करण्यात यावी अशी चर्चा सुरू आहे.