msebnews:चिखली (बुलढाणा): महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत… साहेब…ग्रामीण भागात माणसं राहत नाही का?
महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील जनतेला जनावरे समजतात का? आधीच उष्णतेची लाट असून उष्मघाताचे प्रमाण वाढले आहे.
मात्र काही कारण नसताना चिखली विभागात(मंगरूळ नवघरे) परिसरात महावितरणकडून विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जातो..
महावितरण कडून दिवस रात्र 24 तासात कमीत कमी 100 वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाडा सहन करावा लागत आहे.
तर या वारंवार विद्युत पुरवठा खंडित केल्याने टिव्ही, पंखे, कुलर जळाली.. तर रात्री बेरात्री अचानक काही कारण नसताना किंवा वारा वादळ नसताना चिखली महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातो.
महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत…( msebnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या संधीचा फायदा चोरटे घेत असून अनेक ठिकाणी लाईट नसल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.
msebnews: तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेला जनावरे न समजता माणसं समजून तरी विद्युत पुरवठा विनाकारण खंडित न करता सुरळीत ठेवावा अशी मागणी होत आहे.
प्रतिनिधि मनिष जाधव चिखली बुलढाणा