MPSC ने विद्यार्थी हितात निर्णय घ्यावे : एस आय ओ

 

दि. २५ मे रोजी एस आय ओ(स्टूडेंट्स ईस्लामीक ऑर्गनाइज़ेशन) महाराष्ट्र नॉर्थ ज़ोन कडून तिलक पत्रकार भवन नागपुर येथे एम पी एस सी परीक्षेत होत असलेले गोंधळ, आयोगाच्या भोंडळ कारभारा मुळे विद्यार्थीया समोर येणारे विचित्र पेचप्रसंग आणि विद्यार्थीयांना होत असलेल्या मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत शहरातील पत्रकार बाँधवांनी हजेरी लावली होती।

यावेळी एस आय ओ महाराष्ट्र नॉर्थ ज़ोन अध्यक्ष श्री सैयद जिया उर रहमान यांनी अराजपत्रित संयुक्त परीक्षा 2020 चा निकाला बद्दल तसेच एम पी एस सी डेटा लीक समस्या आणि एम पी एस सी गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेचा गट ब साठी एक व गट क साठी एक असा कट ऑफ लावावा अशी विद्यार्थीयांची माँगणी पत्रकारां समोर ठेवली।
या सर्व विषयांवर ब्रीफिंग देतांना सैयद ज़िया उर रहमान म्हणाले की मा.आयोगाने विद्यार्थीयांना होत आलेल्या नाहक आर्थिक व मानसिक त्रासा बद्दल विचार करावा तसेच मा. सरकारने सुध्दा ह्या विषयाकडे लक्ष घालावे।

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना जन सम्पर्क सचिव मोहम्मद सैफुल इस्लाम म्हणाले की आयोग वर्षांतून फक्त एकदाच संयुक्त अराजपत्रित परीक्षा घेते। lविद्यार्थी वर्षानो वर्ष एक एक परीक्षेची आतुरतेने वाट पाहतात पण अश्या समस्यामुळे विद्यार्थीयांना मानसिक त्रास होतो तसेच विधार्थियांच्या मनात आयोगाच्या कारभारा बद्दल शंका निर्माण होतात।या मानसिक त्रासाला कंटाळून काही विद्यार्थीयांनी अति पाऊल उचलले असल्याची माहिती सुध्दा आहे। आणि जर एखाद्या विद्यार्थीयाने या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला आयोगा कडून ब्लैक लिस्ट करण्यात येतो।

आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात जन सम्पर्क सचिव सैफुल इस्लाम यांनी संयुक्त पूर्व गट ब व गट क परीक्षेचे वेगवेगळे कट ऑफ कशे विद्यार्थी हितात आहे हे अधोरेखित केले। तसेच ह्या समस्या सोडविण्यासाठी एस आय ओ चे पदअधिकारी हे राज्याभरातील वेगवेगळ्या पक्षांचे नेत्यांना भेटत आहे आणि त्यांना आग्रह करीत आहे की त्यांनी या समस्येकडे विशेष लक्ष द्यावे। जर
४ जुन पर्यंत संयुक्त गट ब व संयुक्त क चा वेग वेगळा कट ऑफ बदल राज्य सरकार नी एम पी एस सी ला सुचना दिली नाही तर सांवैधानिक र्मागाने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा पत्रकार परिषदेतुन देण्यात आला।

एस आय ओ कडून ज़ोनल अध्यक्ष सैयद ज़िया उर् रहमान, जन सम्पर्क सचिव मोहम्मद सैफुल इस्लाम, सचिव अफ़्फ़ान मोईन खान तसेच डॉ. जव्वाद हजर होते।

Leave a Comment